Pankaja Munde : घराघरात दारु देणारा नेता पाहिजे की पाणी देणारा? पंकजा मुंडेंचा परळीकरांना सवाल

Pankaja Munde
Pankaja Mundeesakal

बीडः भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे परळी दौऱ्यावर आहेत. एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांच्याविषयी बोलतांना घराघरात चपटी देणारा नेता पाहिजे की पाणी देणारा? असा सवाल उपस्थित केला आहे.

परळी तालुक्यातल्या कौठळी गावामध्ये जलजीवन मिशन योजनेचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमाला पंकजा मुंडे यांची उपस्थिती होती. परळीचे विद्यमान आमदार धनंजय मुंडे यांचं नाव न घेता पकंजा मुंडे यांनी चारित्र्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. चारित्र्यहीन व्यक्ती राजकारणात व्हिलन असते, अशा शब्दांमध्ये पंकजा मुंडे यांनी निशाणा साधला आहे.

Pankaja Munde
Sandeep Deshpande Attack : संदीप देशपांडे हल्ला प्रकरणात अटक केलेला आरोपी ठाकरे गटाचा पदाधिकारी

२०१९च्या विधानसभा निवडणुकीत परळीमध्ये पंकजा मुंडे यांचा धनंजय मुंडे यांनी पराभव केला होता. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये धनंजय मुंडे मंत्री झाले. त्यांच्याकडे समाजकल्याण खातं आलं. आता पुन्हा २०२४च्या निवडणुकांकडे नेत्यांचं लक्ष लागलं आहे.

पंकजा मुंडे सध्या परळी दौऱ्यावर आहेत. जलजीवन मिशन योजनेच्या शुभारंभ सोहळ्यात बोलतांना त्या म्हणाल्या की, परळी शहरामध्ये भूयारी गटार योजनेच्या नावाखाली रस्त्यांची वाट लावली आहे. पुढची पिढी घडवणारा नेता पाहिजे की पिढी वाया घालवणारा नेता पाहिजे? असा सवाल उपस्थित करुन त्यांनी चारित्र्यहीन व्यक्ती राजकारणात व्हिलन असते, अशी टिपण्णी केली आहे.

Pankaja Munde
Video : संदीप देशपांडे हल्ल्याप्रकरणी दुसरा व्हीडिओ आला समोर; स्पष्ट दिसणारे दोघे कोण?

दरम्यान, बीडच्या परळी शहरात नटराज रंगमंदिरात काल कार्यक्रम पार पडला. यावेळी पंकजा मुंडे भावूक झाल्याचे पाहायला मिळालं. कुटुंबाला एकत्र ठेवणे हे भाग्य सर्वांच्या नशिबी नसते. माझ्या घरात कोणी मोठा भाऊ आहे का? आम्ही तिघी बहिणीच आहोत, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी खंत व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com