
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुद्ध वसुली प्रकरणाचा तपास सुरु आहे.
वसुली प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना CBI चे समन्स
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप करून महाविकास आघाडीला गोत्यात आणणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात या विषयासंदर्भात अनेक घडामोडी घडल्या आहेत. आता याप्रकरणी एक नवी माहिती समोर आली आहे. (Param Bir Singh case against CBI summons)
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुद्ध वसुली प्रकरणाचा तपास सुरु आहे. त्यामुळे सीबीआय या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सर्व तपास अधिकाऱ्यांना समन्स पाठवणार आहे. त्यामुळे सिंह यांच्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या तपास अधिकाऱ्यांचे जबाब सीबीआय नोंदवण्याची शक्यता आहे. संबंधित अधिकारी राज्य सरकारने नियुक्त केलेले तपास अधिकारी असून सीआयडी, गुन्हे शाखा किंवा ठाणे पोलिसांत कार्यरत आहेत. या अधिकाऱ्यांनी काय तपास कसा केला हे जाणून घेण्यासाठी सीबीआय जबाब नोंदवणार असल्याची माहिती सूत्रांनी सांगितली आहे.
हेही वाचा: पुढील 4 दिवस राज्यात मेघगर्जनेसह पाऊस; मोसमी वारे लवकरच धडकणार
दरम्यान, सिंग यांच्या विरोधात ठाणे नगर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास पोलिस करत आहेत. ठाण्यातील कोपरी पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या वसुलीच्या गुन्ह्याचा आणि बाजारपेठ पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्याचा तपास सीआयडी करत आहे. तसेच मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या वसुलीच्या गुन्ह्याची सीआयडीकडून चौकशी सुरु आहे.
मुंबईतील गोरेगाव पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या वसुलीच्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट 11 करत होते. याशिवाय परमबीर सिंग यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची एसीबी खुली चौकशी करत होती. हे सर्व गुन्हे आता सीबीआयकडे वर्ग झाल्याने सीबीआय या प्रकरणाचा पारदर्शक तपास करत असल्याची माहिती मिळत आहे.
हेही वाचा: संभाजीराजेंची राज्यसभेची वाट बिकट; अनिल परबांनी स्पष्टच सांगितले
सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी परमबीर सिंह (Parambir Singh) यांच्यावर दाखल झालेल्या सर्व गुन्ह्यांचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. येत्या आठवडाभराच्या कालावधीत परमबीर सिंह यांच्यावर दाखल असणाऱ्या सर्व गुन्ह्यांची कागदपत्रे महाराष्ट्र पोलिसांनी सीबीआयला सोपवावीत, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
परमबीर यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिसांना त्यांचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. तब्बल सात महिने ते अज्ञातवासात होते. ठाणे आणि नवी मुंबईतील पोलिस ठाण्यांमध्ये त्यांच्याविरोधात खंडणी वसूल करणे आणि अॅट्रोसिटीचे गुन्हे दाखल आहेत. मध्यंतरी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कांदिवली येथील कार्यालयात त्यांची चौकशी झाली होती. डिसेंबर महिन्यात परमबीर सिंह यांना पोलीस दलातून निलंबितही करण्यात आले होते.
Web Title: Param Bir Singh Case Against Cbi Summons To Officers Investigating Of Recovery
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..