परमबीर सिंगांकडे अनिल देशमुख यांच्या विरोधात पुरावे नाहीत?

चौकशी आयोगापुढे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून बाब समोर
Parambir-Singh-Anill-Deshmukh
Parambir-Singh-Anill-Deshmukh
Updated on

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात १०० कोटी रुपयांच्या खंडणीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे आता बॅकफुटवर आल्याचं दिसतंय. कारण त्यांच्याकडे देशमुखांविरोधात कोणतेच पुरावे नसल्याचं खुद्द त्यांनीच वकिलांमार्फत चौकशी आयोगाला कळवलं आहे.

अनिल देशमुख यांच्यावर खंडणीचा आरोप करताना परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून खंडणी वसुलीचा गंभीर आरोप केला होता. यामुळं राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला होता. अनिल देशमुख यांना आपलं गृहमंत्रीपद गमवावं लागलं. यानंतर राज्य सरकारनं या प्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्ती चांदिवाल यांचा एक सदस्यीय चौकशी आयोग नेमला आहे. सध्या अनिल देशमुख हे ईडीच्या कोठडीत आहेत.

चांदीवाल आयोगासमोर आता परमबीर सिंग यांनी वकिलांमार्फत प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. यामध्ये त्यांनी अनिल देशमुख यांच्याविरोधात कुठलाही पुरावा आपल्याकडे नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच या पत्राशिवाय आपल्याकडे कोणताही अतिरिक्त पुरावा नसल्याचं सिंग यांनी म्हटलं असून याप्रकरणी उलटतपासणीलाही आपण तयार नसल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, परमबीर सिंग सध्या गायब असून चौकशी आयोगानं त्यांना अनेकदा चौकशीला समारं जाण्यासाठी समन्स बजावलं परंतू ते अद्याप समोर आलेले नाहीत. परमबीर सिंग देशाबाहेर बेल्जिअममध्ये पळून गेल्याचं सांगण्यात येत आहे, काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटद्वारे ही माहिती दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com