esakal | केंद्राच्या मदतीनं परमबीर सिंह यांना शोधत आहोत: वळसे पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

Dilip Walse Patil and Param Bir Singh

केंद्राच्या मदतीनं परमबीर सिंह यांना शोधत आहोत: वळसे पाटील

sakal_logo
By
सुधीर काकडे

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे सध्या बेपत्ता असल्याचे समजते आहे. गेल्या काही दिवसांपासून परमबीर सिंह यांच्याशी संपर्क होत नसून, तपास यंत्रणा त्यांचा शोध घेत आहेत. त्यातच आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील परमबीर सिंह हे विदेशात पळून गेले असतील तर ते गंभीर असल्याचे सांगितले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मदतीन आम्ही परमबीर यांना शोधत आहोत, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

तपास यंत्रणांना आता असा संशय आहे की, परमबीर सिंह युरोपिय देशांत गेले आहेत. यावर बोलताना 'परमविर सिंह हे एक सरकारी अधिकारी असल्यामुळे देशाबाहेर जायच्या आधी सरकारची परवानगी घेणे बंधनकारक आहे. गृहमंत्रालयाच्या मदतीने आम्ही त्यांचा शोध घेत आहोत' असे गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितले. ते जर देशाबाहेर गेले असतील तर ही बाब योग्य नाही. मंत्री किंवा अधिकारी कोणीही असेल तर त्यांना परवानगी घेतल्याशिवाय देशाबाहेर जाता येत नाही. त्यांचं इथे असणं गरजेचं आहे, त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले होते, त्याचा हिशोब करायचा आहे, मात्र आम्ही कोणावरही जाणीवपुर्वक कुणाच्या मागे लागून कारवाई करणार नाही, हा सगळा रुटीन कारवाईचा भाग असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा: परमबीर सिंह देशाबाहेर फरार, तपास यंत्रणेला संशय

दरम्यान, त्यांना राज्य सरकारने अनेक वेळा कळवले आहे कोणताही कर्मचारी आजारपणाच्या रजेवर जातो त्यावेळी त्याचं निवास स्थळ आणि ठिकाण हे राज्य सरकारला कळवले गरजेचे आहे. मात्र या केसमध्ये त्यांनी असं काही केलं नाही, त्यामुळे आम्ही आता त्या दृष्टिकोनातून पावले टाकत आहोत अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

loading image
go to top