

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आऱोप करणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह (Parambir singh) यांच्यावर देखील खंडणीचे अनेक आरोप आहेत. मात्र, सध्या परमबीर सिंह कुठे आहेत? याबाबत कोणालाही माहिती नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी परमबीर सिंह फरार असल्याचा संशय तपास यंत्रणांना असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता राज्य सरकारने उच्च न्यायालयात (high court) परमबीरसिंह यांच्याविरोधातील कारवाईसंदर्भात भूमिका मांडली आहे.
परमबीरसिंह यांच्यावर अटकेची कारवाई तूर्तास करणार नसल्याची हमी राज्य सरकारने यापूर्वीच उच्च न्यायालयात दिली होती. मात्र, आज या प्रकरणावर परत सुनावणी झाली. यावेळी परमबीरसिंह यांच्यावर आता अटकेची कारवाई न करण्यासंदर्भातील आश्वासन पाळले जाणार नाही. तसेच त्यांच्याविरोधात समन्स बजावून देखील ते अद्याप समोर आलेले नाहीत. त्यामुळे ते बेपत्ता असल्याचा निष्कर्ष राज्य सरकारने न्यायालयासमोर मांडला आहे. सरकारच्या बाजूने वकील खंबाटा यांनी युक्तीवाद केला.
दरम्यान, वकील महेश जेठमलानी यांनी परमबीरसिंह यांची बाजू मांडली. परमबीर यांना अद्याप फरार घोषित करण्यात आलेले नाही. याविषयी सायंकाळी सुनावणी घेऊ, असे खंडपीठाने म्हटले असल्याचे जेठमलानी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.