Somnath Suryawanshi Parbhani: पोस्टमार्टम रिपोर्ट आला! सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू शरीरांवरील जखमांमुळे; प्रकाश आंबेडकरांनी शेअर केला अहवाल

Ghati Hospital: तणावाच्या पार्श्वभूमीवर परभणी शहरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. संवेदनशील भागांमध्ये गस्त वाढवून कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी दक्षता घेण्यात येत आहे. घटनेनंतर विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
prakash ambedkar news
prakash ambedkaresakal
Updated on

छत्रपती संभाजी नगरः परभणीमध्ये १० डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली होती. त्यामुळे शहरात ११ डिसेंबरला बंदची हाक देण्यात आलेली होती. बंददरम्यान शहरामध्ये दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. परभणी पोलिसांनी लाठीचार्ज करत आंदोलकांना ताब्यात घेतलं होतं. यापैकी सोमनाथ सुर्यवंशी यांचा रविवारी सकाळी मृत्यू झाला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com