Parbhani : दगडफेक प्रकरणी ताब्यात घेतलेल्या तरुणाचा मृत्यू, पोलिसांनी सांगितले कारण

Somnath Suryavanshi Death : परभणीत झालेल्या दगडफेक आणि जाळपोळ प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सोमनाथ सूर्यवंशी याचा तुरुंगात मृत्यू झाला आहे. याची माहिती पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी दिली.
Parbhani : दगडफेक प्रकरणी ताब्यात घेतलेल्या तरुणाचा मृत्यू, पोलिसांनी सांगितले कारण
Updated on

परभणीत ११ डिसेंबरला झालेल्या दगडफेक, जाळपोळ प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. १० डिसेंबर रोजी शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली होती. यानंतर ११ डिसेंबरला परभणी बंदची हाक दिली होती. परभणी बंद वेळी शहरात दगडफेकीसह जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. यानंतर परभणी पोलिसांनी लाठीचार्ज करत आंदोलकांना ताब्यात घेतलं होतं. यापैकी सोमनाथ सुर्यवंशी याचा आज सकाळी मृत्यू झाला आहे. छातीत कळ येत असल्यानं त्याला रुग्णालयात दाखल केलं. पण तिथं त्याचा मृत्यू झाल्याचं डॉ़क्टरांनी सांगितलं. त्याचं शवविच्छेदन छत्रपती संभाजीनगरमध्ये करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com