सावधान..! लॉकडाउन शिथिल करताच वाढले रुग्ण; कोरोना टेस्टसाठी मागविल्या 'इतक्‍या' किट्‌स 

0Lockdown
0Lockdown

सोलापूर : केंद्र सरकारने लॉकडाउन 30 जूनपर्यंत वाढविला असला तरीही त्यामध्ये शिथिलता आणली आहे. 22 मेपासून राज्यातील रूग्णांच्या संख्येत सरासरी दोनशे ते साडेतीनशेने वाढ झाल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. उन्हाच्या कडाक्‍यात कोरोना विषाणू दम काढत नसल्याची चर्चा असतानाही या विषाणने अनेकांचा घाम काढला. आता पावसाळा सुरु होत असल्याने खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने कोरोना टेस्टसाठी अडीच लाख किट्‌स शिल्लक असतानाही जूनपर्यंत पुरतील एवढ्या सुमारे पाच लाख किट्‌सची केंद्राकडे केल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. 


कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या थेट संपर्कातील व्यक्‍तींची प्राधान्याने टेस्ट केली जाते. तत्पूर्वी, नियमित केली जाणारी टेस्ट आता पाच दिवसांनंतर केली जात असल्याचे सोलापूर महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. संतोष नवले यांनी सांगितले. दुसरीकडे सुरवातीच्या काळात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना ऍडमिट करुन त्याच्यावर उपचार केले जात होते. आता त्यातही बदल झाल्याचे आरोग्याधिकारी सांगत आहेत. राज्यभरात सध्या होम आणि संस्थात्मक क्‍वारंटाईनमध्ये तब्बल सहा लाखांहून अधिक व्यक्‍ती आहेत. यांना 14 दिवस घराबाहेर न पडण्याचे आवाहन करुनही लॉकडाउन शिथिल झाल्याने अनेकजण बिनधास्तपणे फिरत असल्याचे चित्र आहे. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी 50 जणांविरुध्द गुन्हेही दाखल केले आहेत. तर दुसरीकडे जिल्हाबंदी असतानाही तब्बल दोन हजार 829 व्यक्‍ती सोलापुरात आल्याचेही पोलिसांनी सांगितले. या पार्श्‍वभूमीवर संभाव्य स्थितीचा अंदाज घेऊन आरोग्य विभाग ठोस नियोजन करीत असल्याचेही सांगण्यात आले. 
 

ठळक बाबी... 

  • लॉकडाउन शिथिल केल्यापासून दररोज सापडताहेत अडीच हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण 
  • आतापर्यंत चार लाख 71 हजार 573 संशयितांच्या झाल्या कोरोना टेस्ट : 212 कोटींहून अधिक खर्च 
  • लॉकडाउन शिथिल होण्यापूर्वी (21 मेपर्यंत) होते 41 हजार 672 रूग्ण: मागील 11 दिवसांत सापडले तब्बल 28 हजार 341 रूग्ण 
  • 22 मे ते 1 जून या 11 दिवसांत तब्बल एक लाख 64 हजार 771 कोरोना टेस्ट 
  • लॉकडान शिथिल करण्यापूर्वी 21 मेपर्यंत राज्यभरात होते एक हजार 114 प्रतिबंधित क्षेत्र अन्‌ आता आहेत तीन हजार 294 
  • राज्यातील 77 लॅबच्या माध्यमातून होताहेत कोविड-19 च्या टेस्ट : दररोज सरासरी 14 ते 15 हजार टेस्ट 
  • 22 मेपूर्वी ऑरेंज झोनमध्ये अन्‌ त्यापूर्वी ग्रीन झोनमध्ये असलेला एकमेव जिल्हा गडचिरोलीही आता रेडझोनमध्ये 
  • पावसाळा सुरू होणार असल्याने खबरदारी म्हणून सार्वजनिक आरोग्य विभागाने केंद्राकडे मागितल्या जूनपर्यंत पुरेल इतक्‍या टेस्ट किट्‌स 


खासगी लॅबमध्येही कोरोना टेस्टची तयारी


राज्यात सद्यस्थितीत 43 शासकीय तर 34 खासगी लॅब आहेत. या लॅबच्या माध्यमातून दररोज सरासरी 14 ते 15 हजार संशयितांच्या टेस्ट करण्यात येत आहेत. लॉकडाउन शिथिल केल्यापासून बाधितांच्या संख्येत वाढ झाली असून आता पावसाळा तोंडावर आला आहे. या पार्श्‍वभूमीवर आता टेस्टची संख्या वाढविण्याचे नियोजन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले असून खासगी लॅबचा शोध सुरू झाला आहे. सध्या आपल्याकडे अडीच लाख टेस्ट किट्‌स शिल्लक असल्याचे राज्याचे आरोग्य शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले. तर टेस्टची संख्या पाहता आणखी किट्‌सची मागणी केल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com