Eknath Shinde : काम नाही तर पद नाही; निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना इशारा

२०२९ मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी संघटन मजबुतीसाठी संपर्कप्रमुख, विभागीय संपर्कप्रमुख आणि लोकसभा संपर्कप्रमुखांची नियुक्ती केली.
Eknath Shinde
Eknath Shinde

Sakal

Updated on

मुंबई - निवडणुका संपल्या असून आता पक्षवाढीचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे राज्यात शिवसेनेला बळकट करण्यासाठी तळागाळातील शिवसैनिकांपर्यंत पोहोचा. जनतेच्या प्रश्नांवर तत्परतेने काम करा आणि पक्षवाढीसाठी योगदान द्या,’ अशा स्पष्ट सूचना शिवसेनेचे मुख्य नेते अन् उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी पक्षाच्या आमदार, खासदारांसह पदाधिकाऱ्यांना दिल्या. मतदारयाद्यांचे बारकाईने पुनरावलोकन करण्यासाठी बूथ प्रतिनिधींची नियुक्ती करण्याचे आदेश देताना शिंदे यांनी काम दिसले नाही तर पद राहणार नाही,’ असा इशारा शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com