प्राध्यापक भरतीस द्यावी परवानगी ! उच्च शिक्षण विभागाचे वित्त विभागाला पत्र

तात्या लांडगे
Sunday, 11 October 2020

पदभरतीसाठी पाठपुरवा सुरु; वित्त विभागाला दिले पत्र
राज्यातील उच्च महाविद्यालयांमधील प्राचार्य व प्राध्यापकांची रिक्‍त पदे भरण्यास परवानगी द्यावी, असे पत्र उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली वित्त विभागाला नुकतेच पाठविले आहे. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक बिकट असून कोणत्याही पदभरतीनंतर तिजोरीवरील बोजा वाढू नये, याची खबरदारी घेतली जात आहेत. तरीही पदभरतीसाठी पाठपुरवा सुरु आहे. 
- डॉ. धनराज माने, संचालक, उच्च शिक्षण

सोलापूर : राज्यातील उच्च महाविद्यालयांमधील प्राध्यापकांची व प्राचार्यांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्‍त झाली आहेत. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे वित्त विभागाने 4 मे रोजी शासन निर्णय काढून आरोग्य विभागाशिवाय अन्य विभागांच्या पदभरतीवर निर्बंध घातले. तरीही 4 नोव्हेंबर 2018 च्या शासन निर्णयानुसार उर्वरित सुमारे दोन हजार प्राध्यापकांची व 324 प्राचार्यांची पदे भरण्यास मान्यता द्यावी, असे पत्र उच्च शिक्षण विभागाने वित्त विभागाला पाठविले आहे. त्यावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे वित्तमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार असून सकारात्मक निर्णय होईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला आहे.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत सोलापुरात बोलताना म्हणाले, राज्यातील उच्च महाविद्यालयांमधील प्राचार्य आणि प्राध्यापकांची पदे भरतीस परवानगी द्यावी, याबद्दल उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली जाईल. वित्त विभागालाही भरतीस मान्यता मिळावी म्हणून पत्र दिले आहे. मात्र, अन्य खात्यांच्या मंत्र्यांनीही वित्त विभागाकडे पदभरतीस मान्यता द्यावी, अशी मागणी केली. त्यावर वित्त विभागाने भूमिका स्पष्ट केली असून त्यांनी अद्याप निर्णयात बदल केलेला नाही. दरम्यान, राज्यात एक हजार 172 पैकी 324 प्राचार्यांची, तर साडेनऊ हजार प्राध्यापकांची पदे रिक्‍त आहेत. 1 ऑक्‍टोबर 2017 च्या निर्णयानुसार प्राध्यापकांची भरती प्रक्रिया सुरु आहे. त्यानंतर नोव्हेंबर 2018 मध्ये वित्त विभागाने 40 टक्‍के पदभरतीस मान्यता दिली होती. त्यानुसार तीन हजार 580 प्राध्यापकांची पदभरती अपेक्षित होती. मात्र, त्यातील बाराशे पदांची भरती करण्यात आली असून उर्वरित दोन हजार 380 प्राध्यापकांची भरती झालेली नसून त्यासाठी मान्यता मागितली आहे.

पदभरतीसाठी पाठपुरवा सुरु; वित्त विभागाला दिले पत्र
राज्यातील उच्च महाविद्यालयांमधील प्राचार्य व प्राध्यापकांची रिक्‍त पदे भरण्यास परवानगी द्यावी, असे पत्र उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली वित्त विभागाला नुकतेच पाठविले आहे. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक बिकट असून कोणत्याही पदभरतीनंतर तिजोरीवरील बोजा वाढू नये, याची खबरदारी घेतली जात आहेत. तरीही पदभरतीसाठी पाठपुरवा सुरु आहे. 
- डॉ. धनराज माने, संचालक, उच्च शिक्षण

 

राज्यातील रिक्‍त पदांची स्थिती
एकूण प्राचार्य
1,172
प्राचार्यांची रिक्‍त पदे 
324
प्राध्यापकांची रिक्‍त पदे
9500
पदभरतीस यापूर्वी मान्यता
3,580
प्राध्यापकांची भरलेली पदे
1,280


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Permission give me to recruit professors; Letter to the Finance Department of the Department of Higher Education