esakal | नक्‍की वाचा ! डबलसीटला परवानगी मागणाऱ्या 'त्या' व्यक्‍तीचा दंड होणार माफ
sakal

बोलून बातमी शोधा

0Maharashtra_20Police_1.jpg

विषाणूची साखळी खंडीत करण्यासाठी सहकार्याची गरज 
सोलापूर जिल्ह्याच्या तुलनेत शहरात कोरोना या विषाणूचा संसर्ग अद्यापही कायम आहे. विषाणूच्या संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी सोलापुकरांनी सोशल डिस्टन्ससह अन्य नियमांचे तंतोतंत पालन करायला हवे. जेणेकरुन सोलापुरातून कोरोना हा विषाणू निश्‍चितपणे हद्दपार होईल. दुचाकीवर डबलसीट प्रवास करणे बंद करावे, रिक्षात दोनपेक्षा अधिक प्रवासी नसावेत. दवाखान्यात पत्नीस सोडायला जाणाऱ्या त्या व्यक्‍तीचा दंड माफ केला जाईल. मात्र, अशा व्यक्‍तींनी मास्क घालणे, सॅनिटायझरचा वापर करणे आवश्‍यक आहे. 
- अंकूश शिंदे, पोलिस आयुक्‍त, सोलापूर

नक्‍की वाचा ! डबलसीटला परवानगी मागणाऱ्या 'त्या' व्यक्‍तीचा दंड होणार माफ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : जुळे सोलापुरातील आर्शिवाद नगरातील बसवराज धोंडप्पा मुस्के हे त्यांच्या पत्नीला शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये सोडण्यासाठी दुचाकीवरुन डबलसीट जातात. त्यांना पोलिसांनी दोनदा दंड केला असल्याने आता त्यांनी पोलिस आयुक्‍तांकडे डबलसीटसाठी परवानगी अर्ज केला. या पार्श्‍वभूमीवर पोलिस आयुक्‍तांनी दंड माफ करु, अशी ग्वाही दिली.

पोलिस अधिकारी व कर्मचारी स्वत:चा जीव धोक्‍यात घालून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यांवर आहेत. त्यांना सोलापुकरांनी सहकार्य करायलाच हवे. जेणेकरुन कोरोनाचा संसर्ग कमी होईल आणि लवकरच हा विषाणू हद्दपार होईल. तरीही विनाकारण डबलसीट शहरात फिरणाऱ्यांचे प्रमाण वाढलेलेच दिसते. या पार्श्‍वभूमीवर त्यांच्यावर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. आता अत्यावश्‍यक सेवेसाठी पत्नी अथवा अन्य व्यक्‍तीला दवाखान्यात सोडण्यास जाणाऱ्यांना दंड केला जाणार नाही. मात्र, स्वयंशिस्तीचे पालन न केल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, अर्ज केलेल्या व्यक्‍तीचा दंड माफ करणाऱ्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल, असे यावेळी पोलिस आयुक्‍त अंकूश शिंदे यांनी सांगितले. 