Plastic Rice: रेशनिंगमध्ये प्लास्टिकचे तांदूळ? फोर्टिफाईड तांदळामुळे नागरिकांमध्ये संभ्रम

 Plastic Rice
Plastic Ricesakal

Plastic Rice: पालीसह सुधागड तालुक्यात रेशनिंगमध्ये प्लास्टिक स्वरूपाचे तांदूळ अनेकांना सापडत आहेत. लोकांमध्ये भीतीचे वातावरणही पसरले आहे. मात्र, ते फोर्टिफाईड तांदूळ असून लाभार्थी त्यापासून अनभिज्ञ आहेत. त्यामुळे याबाबत अफवांना उधाण आले आहे.

पालीतील भोईआळी येथे नुकतेच अशा प्रकारचे तांदूळ सापडले आहेत. त्यामुळे शिधाधारकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. रेशन दुकानातून लाभार्थ्यांना फोर्टिफाईड तांदूळ दिला जात आहे. कुपोषणावर मात करण्याचा हा एक उपाय आहे.

दररोज खाण्यात वापरल्या जाणाऱ्या तांदळापेक्षा हा वेगळा दिसत असतो. नागरिकांमध्ये जनजागृती न केल्याने नागरिकांना तो प्लास्टिकचा असल्याचा संशय आहे. त्यामुळे नागरिक हे तांदूळ निवडून फेकून देत आहेत. एकंदरीत पालीसह सुधागड तालुक्यातील नागरिकांमध्ये या तांदळाबाबत भीतीचे वातावरण आहे.

 Plastic Rice
Plastic News: मनपा प्रशासन आक्रमक; सहा टन प्लास्टिक केले जप्त!

रेशनिंग दुकानात मिळणारा हा फोर्टिफाईड तांदूळ आहे. या तांदळाबाबत जनजागृती करणे आणि लाभार्थ्यांना माहिती देण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

- उत्तम कुंभार, तहसीलदार, पाली-सुधागड

फोर्टिफाईड तांदूळ रेशन दुकानात मिळतोय. त्याला पाहून प्लास्टिक तांदळाची भेसळ असल्याची शंका येते. हा तांदूळ नेहमीच्या तांदळापेक्षा वेगळा दिसतो. पाण्यात टाकल्यास चिकट होतो व हाताला चिकटतो.

- कल्पेश आंबेकर, तरुण, पाली

रेशन दुकानात प्लास्टिक तांदूळ मिळत असल्याच्या तक्रारी येत आहेत. हा फोर्टिफाईड तांदूळ आहे हे जर खरे असेल, तर नागरिकांच्या तक्रारी का येतात? याचा छडा लावणे गरजेचे आहे. नागरिकांना या तांदळाबाबत माहिती दिली जाते का? हे तपासणे पुरवठा निरीक्षकाचे काम आहे.

- दत्तात्रेय दळवी, अध्यक्ष, स्वयंपूर्ण सुधागड

 Plastic Rice
Black Plastic Side Effects : काळ्या प्लास्टिक बॉक्समधले अन्न विषाप्रमाणेच; यामुळे होऊ शकतो कर्करोग!

बनवण्याची प्रक्रिया

फोर्टिफाईड तांदळात सूक्ष्म पोषक तत्त्वे, विटामिन्स व खनिजांची मात्रा कृत्रिमरीत्या मिसळलेली असते. प्रथम तांदळाची भुकटी तयार केली जाते आणि त्यात हे सर्व पोषक तत्त्वे मिसळली जातात. या मिश्रणाला पुन्हा तांदळाचा आकार दिला जातो. यालाच फोर्टिफाईड तांदूळ म्हणतात. हा तांदूळ १०० किलोमध्ये १ किलो मिसळून वितरित केला जातो.

फोर्टिफाईड तांदळात काय असते?

  1. लोहखनिज - अशक्तपणा व तांबड्या पेशींची कमतरता दूर करते.

  2. फॉलिक ॲसिड - गर्भाचा विकास व नवीन पेशी बनवते.

  3. विटामिन बी १२ - मज्जा संस्थेचे कार्य सुरळीत सुरू ठेवते.

  4. रेशन दुकानदारांची जबाबदारी

  5. - फोर्टिफाईड तांदळाची गुणवत्ता, चव व आरोग्यासाठी असणारे लाभ प्रत्येक लाभार्थ्यांना त्याचा नमुना दाखवणे.

  6. - या तांदळाचा लाभ होण्यासाठी भात शिजवताना योग्य प्रमाणात पाणी टाकावे आणि उरलेले पाणी फेकून देवू नये. हे प्रत्येक लाभार्थ्याला समजावून सांगणे.

 Plastic Rice
Black Plastic Side Effects : काळ्या प्लास्टिक बॉक्समधले अन्न विषाप्रमाणेच; यामुळे होऊ शकतो कर्करोग!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com