
Bihar Video: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांमध्ये मोठ्या संख्येने गर्दी होणे ही काही नवीन गोष्ट नाही. मात्र, बिहारमधील मोतिहारी येथे शुक्रवारी झालेल्या त्यांच्या एका सभेतील व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. हा व्हिडिओ कोणत्याही भाषणाचा, स्वागताचा किंवा घोषणांचा नसून, व्यासपीठासमोरील प्रेक्षक गॅलरीत उपस्थित असलेल्या महिलांमध्ये खुर्च्यांवरून झालेल्या जबरदस्त 'खुर्ची युद्धा'चा आहे. व्हिडिओमध्ये महिला एकमेकांवर खुर्च्या फेकताना दिसत असून, संपूर्ण जागा रणभूमीमध्ये बदलल्याचे चित्र आहे. हा व्हिडिओ शुक्रवारी मोतिहारी येथे झालेल्या पंतप्रधानांच्या सभेतील असल्याचा दावा केला जात आहे.