
नवी दिल्ली: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला आहे. यावेळी त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ट्रम्प असे म्हणताना दिसत आहेत की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षात 'पाच लढाऊ विमाने पाडण्यात आली होती.' हाच व्हिडिओ पोस्ट करत राहुल गांधींनी प्रश्न विचारला, "मोदीजी, 5 विमानांचे सत्य काय आहे? देशाला ते जाणून घेण्याचा हक्क आहे!"