
नागपूर : ‘शंभर वर्षांपूर्वी डॉ. हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बीज रुजवले. गोळवलकर गुरुजींनी त्याला ऊर्जा दिली आणि आज रा. स्व. संघ भारताच्या अमर संस्कृतीचा वटवृक्ष झाला आहे. कोट्यवधी स्वयंसेवक त्याच्या फांद्या आहेत. हा वटवृक्ष आज समाजाला उर्जावान बनवित आहे,’’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले. हिंगणा रोडवरील माधव नेत्रालयाच्या प्रस्तावित वास्तूच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. नागपूर दौऱ्यात मोदींनी काही प्रकल्पांचे उद्घाटनही केले.