'चक्रीवादळानं फक्त गुजरातचं नुकसान झालं का? महाराष्ट्रालाही मदत द्यावी' : गृहमंत्री वळसे पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'चक्रीवादळामुळे फक्त गुजरातचं नुकसान झालं का?'

'चक्रीवादळामुळे फक्त गुजरातचं नुकसान झालं का?'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : तौक्ते वादळाने (Tauktae cyclone) फक्त गुजरातच नव्हे तर महाराष्‍ट्राचेही (Maharashtra) मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गुजरातप्रमाणे (Gujrat) महाराष्ट्रालाही मदत करावी, अशी मागणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (HM Dilip Walse Patil) यांनी केली. (PM Modi should help Maharashtra also said home minister Walse Patil)

हेही वाचा: आता तुमचा स्मार्टफोनच असणार तुमच्या कारची चावी; Google आणणार भन्नाट फिचर

गुरुवारी नागपूर विमानतळावर बोलताना पाटील म्हणाले, मोठे नुकसान झाल्याने केंद्राकडून राज्याला आर्थिक मदतीची अपेक्षा आहे. गुजरातला हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली यावर कोणी आक्षेप घेण्याचे कारणच नाही. तिथे मोठे नुकसान झाले आहे. मात्र महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करणेही योग्य नाही.

पंतप्रधान कुठल्या एका राज्याचे प्रतिनिधी नसतात तर ते संपूर्ण देशाचे असतात. चक्रीवादळाचा इशारा आधीच देण्यात आला होता. त्याचे नियोजनसुद्धा केले होते. यानंतर ३०५ जणांचा मृत्यू झाला. याच्या चौकशीचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहे.

तत्पूर्वी नागपूर विमानतळावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अनिल अहीरकर यांनी स्वागत केले. यावेळी प्रशांत पवार, शहर प्रवक्ता श्रीकांत शिवणकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

हेही वाचा: मधमाश्यांनाही आवडतं आईसक्रीम? त्यांचं आइसक्रीम नक्की कोणतंय? जाणून घ्या

(PM Modi should help Maharashtra also said home minister Walse Patil)

loading image
go to top