Sakal Survey: PM मोदीच पुन्हा किंग? 2024 च्या निवडणुकीबद्दल महाराष्ट्राच्या जनतेची मन की बात काय ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sakal saam survey loksabha 2024

Sakal Saam Survey: PM मोदीच पुन्हा किंग? 2024 च्या निवडणुकीबद्दल महाराष्ट्राच्या जनतेची मन की बात काय ?

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही महिने उरले आहेत. आपली सत्ता येण्यासाठी सर्व पक्ष कंबर कसत आहेत. प्रत्येक पक्ष अनेक कार्यक्रमातून नागरिकांशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच, महाराष्ट्रातील जनतेला काय वाटतं? याचं सर्वेक्षण 'सकाळ-साम'ने केलं आहे. यामध्ये जनतेच्या भावना जाणून घेण्यात आल्या. (PM narendra modi most preferred prime minister candidate 2024 Sakal survey)

अमेरिकेतील मॉर्निंग कन्सल्ट सर्वेनुसार जागतिक पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरले आहेत. त्यानंतर आता NDTV आणि CSDS यांच्या सर्वे मध्ये 2024 मध्ये पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावालाच सर्वाधिक पसंती दिली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील जनतेला काय वाटतं? याचं सर्वेक्षण 'सकाळ-साम'ने केलं आहे.

तर समर्थकांना लोकसभेच्या २०२४ निवडणुकीनंतर पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत असे वाटतं का? असा प्रश्न विचारण्यात आला असता. मोदींना अधिक पसंती दर्शवली आली आहे.

हो या शब्दाला ४२.१ टक्के मतदारांचा कल आहे. तर नाहीकडे ४१.५ टक्के मतदारांनी आपला कल दर्शवला असून १६ टक्के मतदार तटस्थ आहेत.

हा सर्वे २८८ विधानसभा आणि ४८ लोकसभा मतदारसंघात करण्यात आला आहे. यामध्ये ३२ टक्के महिलांनी आपले मत नोंदवले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान मोदींसदर्भात अनेकदा भविष्यवाणी केली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा सत्तेवर येईल, असा दावा त्यांनी केला आहे. एवढेच नाही, तर जागांचा अंदाज वर्तवत, नरेंद्र मोदी किती जागां जिंकत तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असं मोठं विधानही त्यांनी यावेळी केलं आहे.

टॅग्स :BjpNarendra Modi