Latest Marathi News | अखेर PI बाजीराव पवारसह गर्जेवर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime Latest Marathi News

अखेर PI बाजीराव पवारसह गर्जेवर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील मौजे अंतर्वली येथून अल्पवयीन मुलगी वय १६ हिस घराशेजारील राहणाऱ्या अलीम राजू शेख तरुणाने पळवून नेल्या संदर्भात नेवासा पोलीस स्टेशनला मागील महिन्यात गुन्हा दाखल झाला. मुलीचे वडील व चुलते दिनांक १-०५-२०२२ रोजी नेवासा पो स्टेशन मध्ये मुलीच्या तपासा संदर्भात चौकशी करण्यासंदर्भात आले असता पोलीस निरीक्षक यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मुलीचा घरच्यांना बंद खोलीत सकाळी ११ ते ३ च्या वेळेत डांबून ठेवले होते.

सदर गुन्ह्यात आरोपीचा तपास करायचा सोडून नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी मुलीचे आजोबा यांना आपल्या वरती मोठे कलम दाखल करू तुमच्या सर्व कुटुंबीयांनी सहा महिने जेलमध्ये टाकू तुमचा कुटुंबावर गुन्हे दखल झाले आहे. असे म्हणत तुमचे कलम कमी करण्यासाठी सुनील गर्जे राहणार मौजे कुकाणा यांना मध्यस्थी करून पो निरीक्षक बाजीराव पवार यांनी तडजोड रक्कम रुपये रोख स्वरूपात एक लाख पंचवीस हजार रुपये ( १२५००० ) रुपये संबंधित सुनील गर्जे यांच्याकडे जमा केली.

पीडित मुलीचा आजोबांनी सदर रक्कम ही मुलीचा लग्नासाठी जमवलेली असताना पोलीस अधिकाऱ्यांनी बँकेतून काढण्यास भाग पाडले आणि हे चौकशीत देखील निष्पन्न झाले.

सदर विषय हा जिल्हा पोलिस अधीक्षक यांना कळवून पो. निरीक्षक पवार यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सक्तीचा रजेवर पाठवले आणि या संदर्भात चौकशी लावण्याचे निर्देश दिले. दिलेली रक्कम बाजीराव पवारांनी पीडीत तरुणीला परत देखील केली. चौकशीत निष्पन्न झाल्या प्रमाणे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार आणि सुनील गर्जे यांच्या दोघांवर भा.द.वि 384,385, 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Police Fir Register On Pi Bajirao Pawar In Newasa Police Station Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..