Mantralaya News: प्रेयसीला न्याय मिळेना! हतबल तरुणाने थेट मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून मारली उडी; आता…

police inaction in girlfriend rape case  upset Man jumps from 6th floor Mantralaya building
police inaction in girlfriend rape case upset Man jumps from 6th floor Mantralaya building

मुंबई : एका व्यक्तीने मुंबईतील महाराष्ट्र सरकारचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकर समोर आला आहे. याठिकाणू सुरक्षा व्यवस्थेमुळे तो थोडक्यातच बचावला, प्रेयसीवर बलात्कार झाल्यानंतर तीने आत्महत्या केली तीला त्यानंतर तिला न्याय न मिळात नसल्याने हे टोकाचे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान उडी मारलेल्या व्यक्तीचे नाव बापू मोकाशी (43) असून दुपारी तीनच्या सुमारास त्यांनी मंत्रालय इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली. या आधी घडलेल्या अशाच घटनांनंतर अशा प्रकारचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी येथे सुरक्षा जाळी बसवण्यात आली आहे. यामुळे ते थोडक्यात बचावले आहेत. दरम्यान मोकाशी यांना या घटनेनंतर पोलिसांनी जाळीतून बाहेर काढत रुग्णालयात नेले.मोकाशी यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, मरीन ड्राइव्ह पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

हेही वाचा - Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

police inaction in girlfriend rape case  upset Man jumps from 6th floor Mantralaya building
Har Har Mahadev : आता तरी डोळे उघडतील का? 'हरहर महादेव'वरून आव्हाडांचा राज ठाकरेंना संतप्त सवाल

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार प्रेयसीवर बलात्कार झाला होता आणि त्यानंतर तीने आत्महत्या केली. यानंतर आरोपीला अटक करण्यात पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे ते नाराज होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, चार वेळा पत्र लिहिण्यात आले, परंतु आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी काहीही केले गेले नाही, प्रेयसीला न्याय मिळत नाही म्हणून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.

police inaction in girlfriend rape case  upset Man jumps from 6th floor Mantralaya building
Sara Ali khan Photo: शुभमनच्या गावापर्यंत पोहोचली सारा अली खान?,समोर आलेल्या फोटोनं चर्चेला उधाण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com