Police Bharati: असं असेल पोलिस भरतीमध्ये आरक्षण; १५ हजार जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु

Police Bharati 2022
Police Bharati 2022esakal
Updated on

मुंबईः राज्यामध्ये पोलिस भरती प्रक्रियेला अखेर सुरुवात झाली आहे. १४ हजार ९५६ रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया असेल. राज्य पोलिस मुख्यालयाने रिक्त पदांची प्रवर्गनिहाय आरक्षण यादी जाहीर केलीय.

रिक्त १४ हजार ९५६ जागांमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १ हजार ८११ जागा, अनुसूचित जमातीसाठी १ हजार ३५० जगा, विमुक्त जाती (अ) या प्रवर्गासाठी ४२६ जागा, भटक्या जमाती (ब)साठी ३७४ जागा, भटक्या जमाती (क) साठी ४७३ जागा, भटक्या जमाती (ड) साठी २९२ जागा, विमुक्त मागास प्रवर्गासाठी २९२ जागा, ओबीसींसाठी २ हजार ९२६ जागा, ईडब्ल्यूएससाठी १ हजार ५४४ जागा आणि खुल्या प्रवर्गासाठी ५ हजार ४६८ जागा; असं आरक्षण जाहीर करण्यात आलेलं आहे.

कुठे किती जागा...

मुंबई - 6740, ठाणे शहर - 521, पुणे शहर - 720, पिंपरी चिंचवड - 216, मिरा भाईंदर - 986, नागपूर शहर - 308, नवी मुंबई - 204, अमरावती शहर - 20, सोलापूर शहर- 98, लोहमार्ग मुंबई - 620, ठाणे ग्रामीण - 68, रायगड -272, पालघर - 211, सिंधूदुर्ग - 99, रत्नागिरी - 131, नाशिक ग्रामीण - 454, अहमदनगर - 129, धुळे - 42, कोल्हापूर - 24, पुणे ग्रामीण - 579, सातारा - 145, सोलापूर ग्रामीण - 26, औरंगाबाद ग्रामीण- 39, नांदेड - 155, परभणी - 75, हिंगोली - 21, नागपूर ग्रामीण - 132, भंडारा - 61, चंद्रपूर - 194, वर्धा - 90, गडचिरोली - 348, गोंदिया - 172, अमरावती ग्रामीण - 156, अकोला - 327, बुलढाणा - 51, यवतमाळ - 244

येत्या ३ नोव्हेंबरपासून या प्रक्रियेला सुरुवात होईल. ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. राज्य पोलिस मुख्यालयाने २०२१ मधील रिक्त पदांसाठी प्रवर्गनिहाय आरक्षण जाहीर केलेले आहे.

इतर विभागांमधील रिक्त जागा

विभाग मंजूर पदे अंदाजित रिक्त पदे

गृह विभाग २,९२,८२० ५०,८५१

सार्वजनिक आरोग्य ६२,३५८ २६,७१२

जलसंपदा ४५,२१७ २३,४८९

वैद्यकीय शिक्षण ३६,९५६ १४,४२३

महसूल व वन विभाग ६९,५८४ १३,५५७

उच्च व तंत्र विभाग १२,४०७ ४,३९५

वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्ये ३६,९५६ १३,४२३

आदिवासी विकास विभाग २१,१५४ ६,८१३

सार्वजनिक बांधकाम २१,६४९ ९,७५१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com