राज्यात पोलिस शिपाई पदाच्या ३ हजार ४५० जागा भरल्या जाणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 सप्टेंबर 2019

राज्यात प्रथमच ऑनलाइन परीक्षा होणार असून, या प्रक्रियेत पोलिस शिपाई पदाच्या ३ हजार ४५० जागा भरल्या जाणार आहेत. 

भवानीनगर - राज्यातील बहुप्रतीक्षित पोलिस भरती प्रक्रिया आजपासून (ता. ३) सुरू झाली. ऑनलाइन अर्ज भरण्यास सायंकाळपासून प्रारंभ झाला असून, येत्या २३ सप्टेंबरपर्यंत ते भरता येणार आहेत. राज्यात प्रथमच ऑनलाइन परीक्षा होणार असून, या प्रक्रियेत पोलिस शिपाई पदाच्या ३ हजार ४५० जागा भरल्या जाणार आहेत. 

जागा कमी व परीक्षा ‘महापोर्टल’वरून असल्याने भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये नाराजी आहे. मागील वर्षापर्यंत सरासरी ८ लाख उमेदवारांनी पोलिस भरतीत भाग घेतला. अगोदर मैदानी चाचणीचे कमी केलेले गुण, त्याचे कमी केलेले महत्त्व, त्यानंतर परीक्षा महापोर्टलवर घेण्याचा निर्णय व ऑनलाइन परीक्षेमुळे गुणवत्तेला वाव नसल्याची भावना उमेदवारांमध्ये आहे. ऑनलाइन प्रश्‍नपत्रिका वेगवेगळ्या राहणार असल्याने कोणाला सोपा, तर कोणाला अवघड पेपर मिळेल, अशी चर्चा सुरू आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी दोन व विदर्भातीलही ११ जिल्ह्यांपैकी दोनजिल्ह्यांमध्ये भरती होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police recruitment will be filled in Maharashtra