

solapur city cp m raj kumar
sakal
तात्या लांडगे
सोलापूर : गुन्ह्यांचे तपासकाम, सण-उत्सव, जयंती मिरवणुकांमधील बंदोबस्ताची ड्यूटी, मंत्री, व्हीआयपी लोकांच्या दौऱ्यांवेळी बंदोबस्त, अशी कामे नेहमीच पोलिसांना करावी लागतात. दुसरीकडे, जेव्हा आपण आपल्या घरात सुरक्षितपणे झोप घेत असतो, तेव्हा आपल्या सुरक्षेसाठी पोलिस अधिकारी, अंमलदार रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत शहरभर गस्त घालत असतात. सोलापूर शहरातील सात पोलिस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांवर रात्रगस्तीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
सोलापूर शहरात अडीच लाखांवर कुटुंब आहेत, पण शहरात १५ हजार देखील सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. आता उन्हाळ्याचा तडाखा वाढला असून, वीजपुरवठा सारखाच खंडित होत आहे. यामुळे अनेकजण घराच्या छतावर, घराबाहेरील अंगणात झोपतात. त्यावेळी चोरटे डाव साधतात, पण त्यांच्यावर पोलिस लक्ष ठेवून आहेत. त्यासाठी पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त विजय कबाडे, डॉ. अश्विनी पाटील, गौहर हसन यांनी रात्रगस्तीचे वेळापत्रक बनविले आहे. त्याची जबाबदारी पोलिस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांवर सोपविली आहे.
पोलिस ठाण्यांमधील गुन्हे प्रकटीकरण पथके देखील रात्रभर गस्त घालत असतात. प्रत्येकाकडून प्रभावीपणे रात्रगस्त घातली जाते का, हे पाहण्यासाठी शहरातील ३०० हून अधिक ठिकाणी क्यूआर कोड लावण्यात आले आहेत. गस्तीवरील अधिकारी, अंमलदारांना तो क्यूआर कोड त्यांच्या मोबाईलवरून स्कॅन करण्याचे बंधन आहे. वरिष्ठ अधिकारी देखील अचानक भेटी देऊन रात्रगस्तीची पाहणी करतात.
दररोज पोलिसांची शहरात गस्त
पोलिस आयुक्त, उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेसाठी दररोज रात्री ११ ते पहाटे पाच वाजेपर्यंत पोलिसांची गस्त असते. दररोज अधिकारी देखील गस्त घालतात. रात्री ११ नंतर कोणीही विनाकारण रस्त्यांलगत थांबू नये, आपल्या परिसरात काही संशयास्पद व्यक्ती दिसल्यास डायल ‘११२’ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
- राजन माने, सहायक पोलिस आयुक्त, सोलापूर शहर
‘या’ क्रमांकावर कॉल करा अन् ८ मिनिटात पोलिसांची मदत मिळवा
सध्या सोलापूर शहराची लोकसंख्या १२ लाखांवर आहे. शहराच्या सुरक्षेसाठी अडीच हजारांपर्यंत पोलिस आहेत. प्रत्येकवेळी पोलिस प्रत्येक ठिकाणी असतील, अशी स्थिती नाही. त्यामुळे ज्यांना अडचणीवेळी पोलिसांची मदत आवश्यक आहे, त्यांच्यासाठी डायल ‘११२’ हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यावर कॉल आल्यास अवघ्या ७ ते ८ मिनिटांत पोलिसांची मदत मिळते. दरमहा सरासरी ६०० हून अधिक व्यक्ती पोलिसांना त्या क्रमांकावरून संपर्क साधतात, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. याशिवाय मॉर्निंग वॉकसाठी हजारो सोलापूरकर दररोज घराबाहेर पडतात, त्यांच्या सुरक्षेसाठी देखील गुड मॉर्निंग पथके नेमली आहेत. हे पोलिस साध्या वेशात लोकांमध्ये मिसळून त्यांना सुरक्षा देतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.