Sambhaji Bhide : संभाजी भिडेंची चौकशी होणार; पोलिस आयुक्त म्हणतात...

sambhaji bhide
sambhaji bhidesakal

अमरावतीः शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी अमरावती येथे महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. अमरावती येथे त्यांच्यावर गुन्हादेखील दाखल झालेला आहे. त्यात आता पोलिस संभाजी भिडेंना नोटीस बजावणार आहेत.

अमरावतीच्या बडनेर इथं शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात बोलताना संभाजी भिडेंनी महात्मा गांधींचे वडील करमचंद गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. करमचंद गांधी हे मोहनदास अर्थात गांधीजींचे खरे वडील नसून ते एका मुस्लीम जमीनदाराचे पुत्र होते, असं वक्तव्य संभाजी भिडेंनी केलं होतं.

sambhaji bhide
Satyapal Malik : सत्यपाल मलिक यांचा पंतप्रधान मोदींबाबत खळबळजनक विधान; म्हणाले निवडणुकीआधी...

इतकेच नाही तर मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकानं केल्याचा दावादेखील भिडेंनी केला होता. दरम्यान, या विधानामुळं मोठं वादंग निर्माण झालं आहे. काँग्रेस नेते आक्रमक झाले असून त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. भिडेंविरोधात अमरावतीमध्ये गुन्हाही दाखल झाला आहे.

आता अमरावती शहर पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी संभाजी भिडेंची चौकशी होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. पोलिस आयुक्त म्हणाले की, महापुरुषांच्या अवमान प्रकरणी संभाजी भिडे आणि इतर साथीदारांना सीआरपीसीच्या कलम ४१ प्रमाणे चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. पुढील तपासाच्या अनुषंगाने अधिकारी कार्यवाही करीत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

sambhaji bhide
Jioचा धमाका ! २० हजार पेक्षाही स्वस्त लॅपटॉप लाँच, जाणून घ्या JioBook 4Gचे फीचर्स

राजापेठ पोलिसांकडून भिडेंना नोटीस पाठवण्यात येणार असून व्हायरल झालेल्या वादग्रस्त ऑडिओ क्लिपचीही तपासणी करण्यात येणार असल्याचं पोलिस आयुक्तांनी सांगितलं. त्यामुळे भिडेंच्या अडचणी वाढणार असल्याचं दिसून येतय.

आणखी एक क्लिप व्हायरल

'साम टीव्ही'ने दिलेल्या वृत्तानुसार, महात्मा गांधी यांच्या पितृत्वाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर शिवप्रतिष्ठाणचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा ज्योतिराव फुले आणि महाराष्ट्राबरोबरचं भारतभर ज्यांना पुजलं जातं अशा साईबाबांविषयी अपमानकारक उद्गार काढले आहेत.

या कथित ऑडियो क्लिपमध्ये संभाजी भिडे म्हणाले की, "इंग्रजांनी ज्यांना xxxx समाजसुधारकांच्या पदव्या बहाल केल्या, फुले देखील त्याच यादीतले."

संभाजी भिडे यांनी शिर्डीच्या साईबाबांबद्दल देखील आक्षेपार्ह उद्गार काढले. ते म्हणाले, "आपला हिंदू समाज साईबाबांना पुजतो, त्या साईबाबांना देव्हाऱ्यातून काढा."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com