#hyderabadencounter : दिल्लीत कोण काय म्हणाले?

वृत्तसेवा
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

हैदराबादमधील डॉक्‍टर युवतीवर बलात्कार करून तिची हत्या करणारे चारही आरोपी पोलिसांशी झालेल्या चकमकीत शुक्रवारी सकाळी मारले गेले. या घटनेवर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया होत आहेत. यात बहुतेक नेत्यांनी हैदराबाद पोलिसांचे कौतुक केले, तर अनेकांनी या चकमकीवर प्रश्‍न उपस्थित केले आहेत.

नवी दिल्ली : हैदराबादमधील डॉक्‍टर युवतीवर बलात्कार करून तिची हत्या करणारे चारही आरोपी पोलिसांशी झालेल्या चकमकीत शुक्रवारी सकाळी मारले गेले. या घटनेवर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया होत आहेत. यात बहुतेक नेत्यांनी हैदराबाद पोलिसांचे कौतुक केले, तर अनेकांनी या चकमकीवर प्रश्‍न उपस्थित केले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

मेनका गांधी (भाजप) : जे काही झाले ते देशासाठी खूप भयानक आहे. तुम्ही लोकांना अशा पद्धतीने मारू शकत नाहीत. कायद्याला आपल्या हातात घेऊ शकत नाहीत. ते आरोपी होते आणि न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षाच दिली असती. असे होत राहिले तर कायदा असण्याचा, व्यवस्थेचा उपयोग काय? अशा रीतीने न्यायालय आणि कायद्याचा काहीच उपयोग नाही. ज्याच्या मनात येईल त्याने बंदूक हाती घ्यावी आणि ज्याला मारायचे त्याला मारावे. कायदेशीर प्रक्रियेविना तुम्ही त्यांना मारू शकता, तर मग न्यायालय, कायदा आणि पोलिसांचे औचित्य काय राहिले?

ही तर आणीबाणीची वेळ; न्यायव्यवस्थेत बदल झालाच पाहिजे 

सीताराम येचुरी (माकप) : अशा गैरन्याय हत्या करणे म्हणजे महिलांप्रती आपल्या संवेदनांचे उत्तर नाही.

असदुद्दिन ओवेसी (एमएआयएम) : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रत्येक चकमकीची चौकशी झाली पाहिजे.

शशी थरूर (कॉंग्रेस) : न्याय व्यवस्थेबाहेर अशा चकमकी होणे स्वीकार्ह नाहीत.

मायावती (बसप) : उत्तर प्रदेशात महिलांवरील गुन्हांमध्ये वाढ होत आहे, पण राज्य सरकार झोपेत आहे. उत्तर प्रदेश आणि दिल्लीच्या पोलिसांना पण तेलंगणच्या पोलिसांकडून बोध घ्यायला हवा. मात्र दुर्दैवाने या राज्यांमध्ये गुन्हेगारांचा पाहुणचार केला जातो.

रेखा शर्मा (राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा) : कायद्यानुसार न्यायनिवाडा मिळायला हवा होता.

अरविंद केजरीवाल (आम आदमी पक्ष) : या एन्काउंटरमुळे लोक आनंद व्यक्त करीत आहेत. मात्र लोकांचा न्याय व्यवस्थेवरील विश्‍वास उडाला असला आहे ही चिंतेची बाब आहे.
 

लोकेट चटर्जी (भाजप) : हा एक चांगला निर्णय असून लोकांचा न्यायावरील विश्वास उडण्यापूर्वी झालेली ही घटना चांगली आहे. मला सकाळी ही बातमी समजल्यावर आनंद झाला.

जया बच्चन (समाजवादी पार्टी) : उशिरा का होईना पण जे व्हायला हवं ते झाले आहे. न होण्यापेक्षा हे झालेले कृत्य केव्हाही चांगले

रामदेव बाबा : पोलिसांनी धाडसी काम केले आहे. या न्यायामुळे देशातील जनतेला समाधान मिळेल, असे मला वाटते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Political leaders reaction on hyderabad encounter