'महाविकास आघाडीचा निर्णय न झाल्यास काँग्रेस स्‍वबळावर लढणार' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prithviraj Chavan

वडूज येथे एका कार्यक्रमादरम्‍यान उपमुख्‍यमंत्र्यांनी पृथ्‍वीराज चव्‍हाण यांचे नाव न घेता त्‍यांच्‍यावर टीका केली होती.

'महाविकास आघाडीचा निर्णय न झाल्यास काँग्रेस स्‍वबळावर लढणार'

सातारा : मुख्‍यमंत्री असताना पृथ्‍वीराजबाबांनी धमक दाखविल्‍यानेच सातारा येथील मेडिकल कॉलेजला (Satara Medical College) मान्‍यता मिळाली. बारामती येथील मेडिकल कॉलेजच्‍या प्रस्‍तावावरदेखील त्‍यांचीच सही असून बाबांच्‍यात धमक होती, त्‍यामुळेच दुष्‍काळी भागातील पाण्‍याचा प्रश्‍‍न निकाली निघाल्‍याचे सांगत काँग्रेसचे जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. सुरेश जाधव (Dr. Suresh Jadhav) यांनी पत्रकार परिषदेत उपमुख्‍यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी केलेल्‍या टीकेला उत्तर दिले.

वडूज येथे काल झालेल्‍या कार्यक्रमादरम्‍यान उपमुख्‍यमंत्र्यांनी पृथ्‍वीराज चव्‍हाण (Prithviraj Chavan) यांचे नाव न घेता त्‍यांच्‍यावर टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना श्री. जाधव म्‍हणाले, ‘‘मुख्‍यमंत्री असताना पृथ्‍वीराज चव्‍हाण यांनी सातारा मेडिकल कॉलेज मंजूर केल्‍यानंतर त्‍यासाठीची जागा देण्‍यास कोणत्‍या खात्‍याने टाळाटाळ केली आणि त्‍यावेळी त्‍या खात्‍याचे मंत्री कोण होते, याची माहिती जनतेला आहे. दुष्‍काळी भागात आलेले पाणी ही बाबांचीच धमक आहे.’’

हेही वाचा: स्मशानभूमीत अल्पवयीन मुलीच्या मांडीवर 'कोंबडा' ठेऊन पूजन

जिल्‍हाधिकारी कार्यालयाची नवीन इमारत, कऱ्हाडमधील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, तालुक्‍यातील प्रशासकीय इमारती आदी बाबांमुळेच उभ्‍या राहिल्‍याचे सांगत श्री. जाधव यांनी अजित पवारांच्‍या टीकेचा समाचार घेतला. याचदरम्‍यान महाविकास आघाडीचा निर्णय झाल्‍यास ठिक नाही तर काँग्रेस साताऱ्यासह सर्वच पालिकांच्‍या निवडणुका स्‍वबळावर लढण्‍यास तयार असल्‍याचेही त्‍यांनी यावेळी स्‍पष्‍ट केले.

हेही वाचा: 'संसार उद्ध्वस्त करणाऱ्या सोमय्यांवर कारवाई करा, अन्यथा आत्मदहन करू'

काँग्रेसला जिल्‍हा बँकेत हव्‍यात चार जागा

जिल्‍हा बँकेच्‍या निवडणुकीबाबत विचारले असता जाधव म्‍हणाले, ‘‘आम्‍ही चार जागांची मागणी केली असून त्‍याबाबत पृथ्‍वीराजबाबा बोलणी करत आहेत. मागितलेल्‍या चार जागांसाठीचे ठराव आम्‍ही केले असून त्‍यानुसार त्‍या मिळतील, अशी आम्‍हाला आशा आहे. याच निवडणुकीच्‍या अनुषंगाने सर्वपक्षीय विरोधी पॅनेलबाबत पृथ्‍वीराजबाबा आणि शंभूराज देसाई यांच्‍यात चर्चा झाली आहे. त्‍यात येण्‍यासाठी आमदार जयकुमार गोरे इच्‍छुक होते. त्‍यांनी तसा प्रस्‍ताव बाबांकडे दिला होता. मात्र, बाबांनी हा प्रस्ताव नाकारला आहे.’’

Web Title: Political News If No Decision Is Taken By Mahavikas Aghadi The Congress Will Contest The Election On Its Own

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top