विधानपरिषदेच्या आमदारांना विकासनिधी दिला जाऊ नये, अशाप्रकारचा निर्णय झाला आहे का? अशी भीती भाजपचे आमदार परिणय फुके यांनी व्यक्त करत विधानपरिषदेत आमदार म्हणून निवडून येऊन चूक झाली असल्याची भावना त्यांनी सभागृहात जाहीरपणे व्यक्त केली..विधानपरिषद हे वरिष्ठांचे सभागृह असूनही दुजाभावाची वागणूक मिळत असल्याची खंत फुके यांनी व्यक्त केली. याची गंभीर दखल घेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सभागृह नेते आणि गटनेत्यांच्या बैठकीत चर्चा करण्याचे आश्वासन केले.विधानपरिषदेत २६० च्या प्रस्तावावर विरोधी पक्षाकडून आमदार अनिल परब बोलत असताना सभागृहात दोन मंत्री उपस्थित होते. त्याशिवाय कोणीच उपस्थित नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली..एकही अधिकारी सभागृहात नाही. भाषणाच्या नोंदी कोणीही घेत नसल्याकडे आमदार संजय खोडके यांनी लक्ष वेधले.फुके यांनी चार पावले पुढे जात, या सभागृहाला कोणी गंभीरपणेच घेत नसल्याचा संताप व्यक्त केला. ते म्हणाले, की आपल्याला इथे सर्वच हलक्यात घेतात. कोणीच गंभीरपणे घेत नाही. विधान परिषदेच्या आमदारांना दोन वर्षे निधीच दिला नाही. जिल्हा नियोजन बैठकीत विधान परिषदेच्या आमदारांना निधी द्यायचा नाही, अशी चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले..विधानसभेच्या आमदारांबद्दल तक्रारपरिषदेच्या आमदारांना मागच्या दाराने आल्याचे हिणवले जात असल्याची तक्रारही फुके यांनी केली. मात्र पुढच्या दाराने निवडून येतात ते २००, ४०० नाहीतर दहा हजार मतांनी निवडून येत असतील. पण परिषदेचा एक-एक आमदार दोन ते सहा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असतो..आपण त्यांच्यापेक्षा मोठ्या भागाचे प्रतिनिधित्व करत असल्याचे त्यांनी विधानसभेच्या आमदारांना सुनावले. विधानपरिषदेच्या आमदारांनी वेगवेगळ्या आयुधांमार्फत उपस्थित केलेल्या प्रश्नांवर मंत्रालयाकडूनही उत्तर मिळत नसल्याकडे फुके यांनी लक्ष वेधले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.