निवडणुकीच्या तोंडावर मनसे भाजपमध्ये खलबतं? शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निवडणुकीच्या तोंडावर मनसे भाजपमध्ये खलबतं? शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट

निवडणुकीच्या तोंडावर मनसे भाजपमध्ये खलबतं? शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले. आशिष शेलार यांनी ट्विट करून राज ठाकरे यांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले असल्याची माहिती दिली आहे. ट्विटरवर फोटो शेअर करत त्यांनी ही माहिती दिली आहे.

याआधी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही राज ठाकरे यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज ठाकरे यांच्यात वाढत असलेल्या भेटीगाठी मुळे आगामी महानगरपालिका निवडणुकेच्या तोंडावर दोन्ही पक्षाच्या युतीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

हेही वाचा: Amit Shah : अमित शहांच्या मुंबई दौऱ्यात ठरणार मिशन BMC ची रणनीती

दोन दिवसात राज ठाकरे यांना भेटणारे ते तिसरे भाजप नेते आहेत. राज ठाकरेंच्या भेटीला अनेक भाजप नेते येऊन गेले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चाना उधाण आलं आहे.

Web Title: Politics Ashish Shelar Meets Raj Thackeray Mns Bjp Alliance Possibilities

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..