
पंढरपूर - केवळ सत्ता मिळवणे हे आमचे धोरण नाही. तर ज्यांनी आम्हाला खुर्चीवर बसवले, त्या सर्वसामान्य लोकांचे प्रश्न आणि समस्या सोडवण्याचा आमचा अजेंडा आहे. लोकांची कामे करणे हेच माझे ध्येय आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.