esakal | 'संजय राठोड यांचा राजीनामा घेऊ नका'; पुजाच्या कुटुंबीयांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बोलून बातमी शोधा

CM_Uddhav_thackeray_Pooja_Chavan_Case}

पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी मुंबईत आज, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिले आहे.

'संजय राठोड यांचा राजीनामा घेऊ नका'; पुजाच्या कुटुंबीयांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : पुण्यात झालेल्या पूजा चव्हाण संशयित मृत्यू प्रकरणात आज, मोठी घडामोड पाहायला मिळाली. गेल्या अनेक दिवसांपासून वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी होत असल्याने आज राठोड यांनी पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. वनमंत्री राठोड यांनी मुख्यमंत्री यांच्या 'वर्षा' या निवासस्थानी जाऊन, पदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा स्वीकारला असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली. पूजा चव्हाणचा मृत्यू दुर्दैवी आहे. सरकार या प्रकरणात संवेदनशील आहे, पण दोषी आढळल्यास कोणालाही पाठिशी घातलं जाणार नाही, असंही मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केलं. आज, पुजाच्या कुटुंबीयांनी माझी भेट घेऊन एक विनंती पत्र दिल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितलं. 

Breaking: संजय राठोड प्रकरणावर मुख्यमंत्री पहिल्यांदा बोलले; 'गलिच्छ राजकारण'​

पूजाचे आई-वडील मुख्यमंत्र्यांना भेटले
पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी मुंबईत आज, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिले आहे. हे पत्र मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेत वाचून दाखवण्यात आले. पुजाच्या कुटुंबीयांनी सरकार आणि तपास यंत्रणेवर विश्वास दाखवला आहे. त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, ''आम्ही आमची मुलगी गमावली आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होऊन दोषींना शिक्षा द्यावी. या प्रकरणातील संशयावरून संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. परंतु, केवळ संशयावरून राठोड यांचा राजीनामा घेऊ नये. राठोड हे आमच्या समाजातून खूप संघर्षातून इथपर्यंत आले आहेत.''

Breaking: शाळा-महाविद्यालये सुरु करण्याबाबत मोठा निर्णय​

'रक्ताचं नातं नाही'
दरम्यान, आज पुण्यातील वानवडी पोलिस ठाण्यात पुजाचे नातेवाईक आणि भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी ठिय्या आंदोलन केले. याविषयीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचारणा करण्यात आली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, 'या संदर्भात पुजाच्या कुटुंबीयांना आम्ही विचारणा केली आहे. आंदोलन करणारे आमचे नातेवाईक आहेत. परंतु, त्यांच्याशी रक्ताचं नातं नाही, असं पुजाच्या कुटुंबीयांनी स्पष्ट केलं आहे.'

- राज्यभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)