esakal | पोपटराव पवार, राहिबाईंमुळे पुन्हा नगरच्या शिरपेचात मानाचा तुरा

बोलून बातमी शोधा

POPATRAO PAWAR AND RAHIBAI AWAED IN PUNE

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे हा पुरस्कार दिला जातो. नगर जिल्ह्यातील या दोघांना नुकताच सर्वोच्च पद्मश्री सन्मान जाहीर झाला आहे. दोघांमुळे नगर जिल्ह्याच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाच तुरा खोवला गेला आहे.

पोपटराव पवार, राहिबाईंमुळे पुन्हा नगरच्या शिरपेचात मानाचा तुरा
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर ः आदर्श हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार व अकोले तालुक्यातील कोंभाळण्याच्या बीजमाता अशी ओळख असलेल्या राहीबाई पोपेरे यांना जीवनसाधना गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे हा पुरस्कार दिला जातो. नगर जिल्ह्यातील या दोघांना नुकताच सर्वोच्च पद्मश्री सन्मान जाहीर झाला आहे. दोघांमुळे नगर जिल्ह्याच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाच तुरा खोवला गेला आहे. पुणे विद्यापीठाच्या वर्धापनदिनी हा पुरस्कार प्रदान केला जाईल. 

काय केले पोपटरावांनी
पोपटराव पवार यांच्या कामाची ख्याती देशभर आहे. नगर तालुक्यातील हिवरे बाजार या अवर्षग्रस्त गावाचा त्यांनी कायापालट केला आहे. सरपंच हे पद केवळ मिरवण्यासाठी नाही तर गावाचा कायापालट करण्यासाठी असते, हे त्यांनी १९९०साली दाखवून दिले. त्यापूर्वी गावात व्यसनाधीनता, पाणीटंचाई, आरोग्यविषयक प्रश्न होते. भांडणे, मारामाऱ्यांसाठी हे गाव कुख्यात होते. पोपटरावांनी आपले क्रिकेटच्या करिअरला तिलांजली देऊन गावाची वाट धरली. आणि गावाला पाणीदार बनवले. ग्रामविकास आणि पाटलोटक्षेत्रात या गावाने पोपटरावांच्या मार्गदर्शनाखाली पथदर्शी काम केले.

अमीर खानही आहे फॅन

अभिनेता अमीर खानही पोपटरावांच्या या कामाचा फॅन आहे. त्याने हिवरेबाजारमध्ये येऊन त्यांची वाहवा केली आहे. क्रिकेटपटू व्ही.व्ही.एस. लक्ष्मणनेही ट्वीट करून प्रशंसा केली आहे. 

बीजमाता राहीबाई 

आदिवासी भागात राहून राहीबाई पोपेरे यांनी मोठी चळवळ उभी केली आहे. संकरीत बियाणांमुळे उत्पादनांमध्ये मोठी क्रांती झाली खरी परंतु त्याने अनेक आजारांना निमंत्रण दिले. त्यामुळे पुन्हा लोक देशी वाणांकडे वळले आहेत. आता हे देशी वाण नामशेष झाले आहे. मात्र, राहीबाई यांनी हे वाण जतन करण्याचे काम केले. ५४ बियाणांचे ११६ वाण त्यांनी जतन केली आहेत. गावातील तसेच परिसरातील महिलांना हे काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. त्यांना सीड मदर या नावानेही ओळखले जाते. त्यांनी बियाणांची बँकच तयार केली आहे. आदिवासी भागात राहून केलेले त्यांचे हे कार्य लाख मोलाचे आहे.