esakal | लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रथम स्थानी; तर उद्धव ठाकरे....
sakal

बोलून बातमी शोधा

Chief-Ministers

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री म्हणून लोकप्रियता वाढत आहे. कोरोनाच्या संकटात उद्धव ठाकरे यांनी मोठ्या धैर्याने सामना केला. देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्थान मिळवले आहे. इंडिया टुडे आणि कार्वी इनसाईट्‌सने (मूड ऑफ द नेशन सर्व्हे) केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे.

लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रथम स्थानी; तर उद्धव ठाकरे....

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - एका सर्वेक्षणातून पुढे आलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पहिल्या; तर उद्धव ठाकरे लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत सातव्या क्रमांकावर आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री म्हणून लोकप्रियता वाढत आहे. कोरोनाच्या संकटात उद्धव ठाकरे यांनी मोठ्या धैर्याने सामना केला. देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्थान मिळवले आहे. इंडिया टुडे आणि कार्वी इनसाईट्‌सने (मूड ऑफ द नेशन सर्व्हे) केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे. देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे यांनी सातवे स्थान पटकावले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. योगींनी सलग तिसऱ्यांदा सर्वोच्च स्थान मिळविले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हा सर्व्हे यंदा १५ ते २७ जुलै या कालावधीत ९७ लोकसभा मतदारसंघात केला आहे. आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, दिल्ली, हरियाना, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, राजस्थान, तमिळनाडू, तेलंगण, उत्तर प्रदेश आणि पश्‍चिम बंगाल या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची कामगिरी तपासून ही क्रमावारी जाहीर करण्यात आली आहे. 

बिगर भाजप  मुख्यमंत्र्याना पसंती
विशेष म्हणजे यादीत भाजप आणि काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची लोकप्रियता जास्त दिसून आली आहे. सर्वेक्षणातील पहिल्या सातपैकी सहा मुख्यमंत्री बिगर भाजप व काँग्रेसशासित राज्यांचे आहेत. दिल्लीची धुरा दुसऱ्यांदा सांभाळणारे अरविंद केजरीवाल या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री मंत्री जगनमोहन रेड्डी तिसऱ्या क्रमांकावर आहेत; तर पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत.

Edited By - Prashant Patil