Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra Cabinet ExpansionEsakal

Maharashtra Cabinet Expansion: पावसाळी अधिवेशनानंतर राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता; कोणाला मिळणार मंत्रीपदांची संधी?

Maharashtra Cabinet Expansion: काही महिन्यांपासून रखडलेला राज्याचा मंत्रीमंडळ विस्तार अधिवेशनाच्या नंतर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. १२ जुलै रोजी अधिवेशन संपेल. त्यानंतर मंत्रीमंडळ विस्ताराची शक्यता आहे.

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार विधिमंडळ अधिवेशनानंतर होण्याची शक्यता राज्याच्या राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. भाजपला ६, शिवसेनेला ५ तर अजित पवार गटाला ३ मंत्रिपदे दिली जाण्याची शक्यता आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेला मंत्रीमंडळ विस्तार येत्या काही दिवसांमध्ये होणाची चिन्ह दिसून येत आहेत. विधानसभा निवडणुकीला चार महिने राहिलेले असताना रिक्त असलेली १४ मंत्रिपदे भरण्याच्या हालचालींना वेग आला आहेत. राज्याचील पावसाली अधिवेशन १२ जुलै रोजी संपणार आहे. त्यानंतर दोन दिवस भाजपच्या प्रदेश कार्य समितीची पुणे येथे बैठक पार पडणार आहे. त्यानंतर विस्तार होईल,अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Maharashtra Cabinet Expansion
Manoj Jarange: जरांगेंवर कोण टेहळणी करतंय? आंतरवलीत घरावर ड्रोनच्या घिरट्या, गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण

दरम्यान, भाजपने ६ जागा आणि उर्वरीत ८ पैकी चार-चार मंत्रिपदे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसला द्यावीत, असा अजित पवार गटाचा आग्रह असल्याची माहिती आहे. मात्र, मुख्यमंत्री शिंदे हे पाच मंत्रिपदांसाठी आग्रही असल्याचे वृत्त आहे. या संदर्भातील वृत्त सुत्रांच्या हवाल्याने एका मराठी वृत्तसंस्थेने दिले आहे.

Maharashtra Cabinet Expansion
Weather Update : राज्यात पावसाचा हायअलर्ट! या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतील मोठ्या पराभवानंतर आता आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून राजकीय पक्षांनी हालचाली सुरू केल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी विस्तार होणे आवश्यक असल्याचे मत भाजप नेत्यांनी वर्तवले आहे. सद्याच्या घडीला मंत्रिमंडळात मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांसह २९ मंत्री आहेत. त्यात भाजपचे १०, शिंदेसेनेचे १० आणि अजित पवार गटाचे ९ मंत्री आहेत.

Maharashtra Cabinet Expansion
शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश! अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरीचे बंधन; ‘प्रवेश कॉलेजमध्ये पण उपस्थिती क्लासलाच’; आता बोर्ड परीक्षेला येणार अडचण

कोणाला किती मंत्रीपद मिळणार?

मंत्रिमंडळ विस्तारात महायुतीतील मित्रपक्षांना कोणाला किती मंत्रिपदं मिळणार, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र, गेल्या मंत्रीमंडळ विस्तारापासून प्रतीक्षेत असलेल्या संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांची मंत्रिपदी वर्णी लागणार, असं सूत्रांची माहिती आहे. संदिपान भुमरे हे खासदार झाल्याने त्यांची एक जागा रिक्त झाली आहे. शिंदे गट आणि अजित पवार गटाला प्रत्येकी ३ मंत्रिपदे मिळू शकतात, अशी शक्यता आहे. याबासंबधीचे वृत्त साम टिव्ही मराठीने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

Maharashtra Cabinet Expansion
'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिणी'चा अर्ज ‘येथे’ भरता येईल ऑफलाईन! ‘नारीशक्ती’ ॲपवर घरबसल्या अर्ज भरण्याची सुविधा; ‘ही’ कागदपत्रे जरूरी, 15 ऑगस्टपासून 1500 रूपये खात्यात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com