esakal | पावसाचा धुमाकूळ! पुढील चार तास पुण्यासहित 'या' ठिकाणी होणार कोसळधार
sakal

बोलून बातमी शोधा

पुढील चार तास पुण्यासह 'या' ठिकाणी होणार कोसळधार

पुढील चार तास पुण्यासह 'या' ठिकाणी होणार कोसळधार

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस पडतोय. पुण्यात सध्या जोरदार पाऊस सुरु झाला आहे. लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, रायगड जिल्ह्यांत तीव्र ते अत्यंत तीव्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पावसाबाबत माहिती देणारे ट्विट्स भारतीय हवामानशास्त्र पुणे विभागाचे प्रमुख के एस होसळीकर यांनी केले आहेत.

येत्या दोन-तीन तासांत पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यावेळी जोरदार ढगांचा गडगडाट तसेच मुसळधार पाऊस होणार आहे. सध्या सर्व पुणेकरांनी घरीच रहा, असा सावधगिरीचा इशारा देखील विभागाकडून देण्यात आला आहेत. या मुसळधार पावसात झाडे कोसळण्याची, जोरदार वारा वाहण्याची शक्यता आहे.

राज्यात ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून विविध भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत असून कोकण, विदर्भात मेघगर्जनेसह पावसाचा तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा येथील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला आहे. आता पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याने पुढील 4-5 दिवसांत राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची नोंद झाली. उर्वरित राज्यातील बऱ्याच ठिकाणी पाऊस नोंदला गेला. तर कोकणात कमाल तापमान हे सरासरीच्या १ ते ३ अंश सेल्सिअस जास्त नोंदले गेले. मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे. तसेच पुढील चार दिवस राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.

loading image
go to top