
‘महाराष्ट्रात राजकारण नव्हे सत्तेचे माजकारण सुरू आहे. पण हे थांबवण्यासाठी सर्वच पक्षांनी एकत्रित बसावे. कोणत्याही पक्षाने जर गुंड घेतले असतील आणि त्यांना सत्तेसाठी वापरले असेल किंवा कळत-नकळत त्यांना निवडून आणून सत्तापदे दिली गेली असतील तर ती आधी काढून घेतली पाहिजेत,’ असे आवाहन शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केले.