माजी गृहमंत्र्यांनी पुन्हा एकदा पार पडली शरद पवारांच्या PA ची भूमिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिलीप वळसे पाटील

Dilip Walse Patil : माजी गृहमंत्र्यांनी पुन्हा एकदा पार पडली शरद पवारांच्या PA ची भूमिका

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा सध्या शिर्डी इथं सुरू आहे. यासाठी राष्ट्रवादीचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील शिर्डीमध्ये उपस्थित आहेत. पवारांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, शिबीर संपल्यावर ते पुन्हा रुग्णालयात दाखल होतील. यावेळी त्यांना पूर्ण भाषण करता आले नाही. त्यामुळे त्यांचे उर्वरित भाषण दिलीप वळसे पाटील यांनी वाचून दाखवले.

हेही वाचा : एका सुफी विचारवंताच्या नजरेतले हिंदुत्व

या भाषणामध्ये, संसदीय लोकशाहीमध्ये केंद्रात एक सत्ता आणि राज्यात दुसरी सत्ता असू शकते केंद्र आणि राज्यातील नेतृत्वातील धोरणात अंतर असू शकते. केंद्रातील सत्तेने राज्यातील नेतृत्वाचा मान राखायला हवा. आज अनेक राज्यामध्ये केंद्रातील विचाराशी सहमत नसलेली सरकारे आहेत. काही राज्यांमध्ये भाजपची सत्ता नसताना देखील केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून अवैधानिकरित्या राज्यातील सत्ता हस्तगत केली. अशी टीका शरद पवारांनी केंद्र सरकारवर केली.  

हेही वाचा: अजित पवार नाराज? राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याला सलग दुसऱ्या दिवशी गैरहजर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुभवी नेते दिलीप वळसे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या स्वीय सहाय्यक पदापासून तर अनेक कॅबिनेट मंत्रिपदांपर्यंत जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. याच वळसे पाटलांनी आज शरद पवारांचे भाषण वाचून दाखवले आहे. दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांचे एकनिष्ठ नेते म्हणून ओळखले जातात.