
पाली : वारंवार विद्युत पुरवठा खंडित होणारा वीज पुरवठा आणि मुख्यालयी राहणारा लाईनमन मिळावा याकरिता वाघोशी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी पालीतील महावितरण कार्यालयाला घेराव घातला. तसेच यावेळी आपल्या समस्या वीज वितरण अधिकाऱ्यांना सांगून त्यांना जाबही विचारला.