"पीपीटीसीटी'मुळे गर्भवतींच्या बाळांमधील एचआयव्हीच्या प्रमाणात घट 

"पीपीटीसीटी'मुळे गर्भवतींच्या बाळांमधील एचआयव्हीच्या प्रमाणात घट 

मुंबई - "प्रिव्हेंशन ऑफ पॅरेंट्‌स टू चाईल्ड ट्रान्समिशन ऑफ एचआयव्ही' (पीपीटीसीटी) या चाचणीमुळे एचआयव्हीग्रस्त गर्भवतींच्या बाळांना या विषाणूंची बाधा होण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली आहे, असा दावा आरोग्य खात्याने केला आहे. 

तीन वर्षांत 2509 गर्भवतींना एचआयव्हीची लागण झाल्याची नोंद झाली आहे. गर्भातील बाळाला त्याची बाधा होऊ नये यासाठी राज्य सरकारने ऑक्‍टोबर 2014 पासून राज्यात "पीपीटीसीटी' सुरू केली आहे. या चाचणीनंतर गर्भवतींनाही एचआयव्ही होण्याच्या प्रमाणात घट झाल्याची महाराष्ट्र राज्य एड्‌स नियंत्रण सोसायटीची आकडेवारी आहे. पालिका किंवा सरकारी रुग्णालयात नोंदणी करण्यासाठी येणाऱ्या गर्भवतींनी एचआयव्ही चाचणी करणे बंधनकारक असते. त्यानुसार ही आकडेवारी समोर आली आहे. 

एचआयव्हीग्रस्त गर्भवतींची संख्या 
वर्ष... तपासणी झालेल्या महिला.... एचआयव्हीग्रस्त महिला 
2016-17 - 20 लाख 37 हजार 845.... 959 
2017-18 .... 22 लाख 2 हजार 820.... 935 
2017 (डिसेंबरपर्यंत) ः 16 लाख 55 हजार 466 ....415 

एचआयव्हीग्रस्तांचे प्रमाण घटले 
राज्यात काही वर्षांत एचआयव्हीग्रस्तांचे प्रमाण 0.047 टक्‍क्‍यांवरून 0.037 टक्‍क्‍यांवर आल्याची माहिती सूत्रांनी दिली. जनजागृतीचा हा परिणाम असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com