NCP News : प्रदीप सोळुंके यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी; पक्षाकडून 'हा' उमेदवार रिंगणात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar

NCP News : प्रदीप सोळुंके यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी; पक्षाकडून 'हा' उमेदवार रिंगणात

औरंगाबादः औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विक्रम काळे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. काही वेळापूर्वी राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ही माहिती देण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ट्विट करुन सांगितलं की, औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघासाठी विक्रम काळे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी काळे यांचा अधिकृतरित्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.

सोबत जोडलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं की, राज्यामध्ये सध्या विधान परिषद शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. राष्ट्रवादीने औरंगाबाद विभागासाठी विक्रम काळे यांना पक्षाकडून एए आणि बीबी फॉर्म दिलेला आहे.

मात्र प्रदीप सोळुंके यांनी विक्रम काळे यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे आणि त्यांना सांगूनही अर्ज मागे न घेतल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. तसं प्रसिद्धीपत्रक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काढलं आहे.

मागील अनेक वर्षांपासून प्रदीप सोळुंके राष्ट्रवादी काँग्रेससोबत पक्षसंघटनेमध्ये काम करत आहेत. त्यांनी वक्तृत्वाच्या जोरावर पक्षामध्ये वेगळं स्थान निर्माण केलं होतं. परंतु शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरुन पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली आहे.

टॅग्स :Sharad PawarNCPaurangabad