esakal | राज्याने प्रस्ताव दिल्यास पिकविमा भरण्यास मुदतवाढ- रावसाहेब दानवे
sakal

बोलून बातमी शोधा

raosaheb danve

पिकविमा भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. पण, इच्छा असुनही अनेक शेतकऱ्यांना विविध अडचणींमुळे पिकविमा भरता आला नव्हता. यासंदर्भात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे

राज्याने प्रस्ताव दिल्यास पिकविमा भरण्यास मुदतवाढ- दानवे

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

मुंबई- पिकविमा भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. पण, इच्छा असुनही अनेक शेतकऱ्यांना विविध अडचणींमुळे पिकविमा भरता आला नव्हता. यासंदर्भात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्य सरकारनं प्रस्ताव पाठवल्यास पीकविम्याची मुदत वाढवण्यास केंद्र सरकारची तयारी, असं ते म्हणाले आहे. राज्य सरकारने प्रस्ताव पाठवल्यास पिकविमा भरण्यास शेतकऱ्यांना मुदतवाढ देण्यात येईल, असं आश्वासन कृषीमंत्र्यांनी दिले असल्याचं दानवे यांनी सांगितलं. पीकविमा भरण्यास मुदतवाढ मिळाल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. एका मराठी माध्यमाशी दानवे बोलत होते. (pradhan mantri fasal bima yojana today last day crop insurance ravsaheb danve)

रावसाहेब दानवे म्हणाले की, 'पीकविमा भरण्याची इच्छा असूनही अनेकांना तसं करता आलेलं नाही. राज्यासह अनेक ठिकाणी पोर्टल बंद पडले आहेत. लोक पैसे घेऊन रांगेत उभे आहेत, पण पोर्टलची अडचण असल्याने अनेकांना पीकविमा भरता आलेला नाही. अशा तक्रारी माझ्याकडे येत आहेत. नेते हरिभाऊ बागडे यांनी मला फोन करुन यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर मी कृषीमंत्र्यांना एक पत्र दिलं आहे. त्यांना मुदतवाढ देण्याची मागणी केली. त्यांनी मला सांगितलं की, राज्याने अशाप्रकारचा प्रस्ताव दिल्यास मुदतवाढ देण्यात येईल. राज्यानेही केंद्राकडे प्रस्ताव द्यावा यासाठी बोलणार आहे. राज्य सरकारने यासंदर्भात ई-मेल केल्यास शेतकऱ्यांना मुदतवाढ मिळले. 15 दिवसांपर्यंत पीकविम्या भरण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.'

हेही वाचा: Twitter कडून माहिती मागवण्यात भारत जगात अव्वल

पिकविमा भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे, असे असताना राज्यातील जवळपास 20 टक्के शेतकऱ्यांनी पिकविमा काढला आहे. सर्वच जिल्ह्यांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू आहे. असे असताना शेतकरी याबाबत फारसे उत्साही दिसत नाहीत. शिवाय अर्ज करणाऱ्यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पीक विम्याचा लाभ घ्यावा यासाठी सरकारला प्रयत्न करावे लागणार आहेत. अनेक भागात पावसाने हुलकावणी दिली असल्याने पेरण्या अजून झालेल्या नाहीत. त्यामुळे इच्छा असताना शेतकऱ्यांनी पीकविमा काढलेला नाही. पीकविम्या भरण्याच्या तारखेमध्ये वाढ करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.

loading image