Praful Patel : ''होय, 2004 पासून भाजपशी युती व्हावी म्हणून मी आग्रही होतो'', प्रफुल्ल पटेलांनी सगळाच इतिहास काढला

''होय, मी 2004 सालापासून भाजपाशी युती व्हावी असा आग्रह पवार साहेबांकडे धरला होता. तरी पण त्यांचा मान, सन्मान व त्यांच्याविषयीचा आदर असल्याने मी त्यांच्यासोबत राहिलो. त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाची संधी दिल्याबद्दल मी सदैव त्यांचा आभारी राहीन. संधी मिळाल्यावर देशासाठी व जनतेसाठी चांगले काम करून पवार साहेब आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा सन्मान वाढविण्याच्या दृष्टीने मी सतत प्रयत्न केले.''
Praful Patel
and SHarad Pawar
Praful Patel and SHarad Pawar Esakal

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी रविवारी सायंकाळी एक ट्वीट करुन आपण २००४ मध्ये भाजपसोबत युती व्हावी, यासाठी पवार साहेबांकडे आग्रह धरल्याचं मान्य केलं आहे. शिवाय तुमच्याबद्दलचा आदर कायम असल्याचंही पटेलांनी म्हटलंय.

काय म्हणाले होते शरद पवार?

प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत बोलताना शरद पवार यांनी मोठं विधान केलं होतं. २००४ पासून प्रफुल्ल पटेल भाजपसोबत जाण्यास आग्रही होते. भाजपने इंडिया शायनिंगचा प्रचार सुरु केला, तेव्हा ते भाजपमध्ये जाण्यास आग्रही होते. अटल बिहारी वाजपेयी यांच्याविषयी आदर असला तरी मते मिळणार, असं मी त्यांना सांगत होतो, असे शरद पवार म्हणाले. शेवटी मी प्रफुल्ल पटेल यांना म्हटलं तुम्हाला हवं तर तु्ही भाजपबरोबर जा, त्यावेळी त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं, असे शरद पवार यांनी 'लोकसत्ता'च्या मुलाखतीत सांगितले.

Praful Patel
and SHarad Pawar
Farooq Abdullah: फारुख अब्दुल्लांच्या सभेत चाकूहल्ला; 3 कार्यकर्ते जखमी, दोघांची स्थिती गंभीर

प्रफुल्ल पटेलांचं ट्वीट

होय, मी 2004 सालापासून भाजपाशी युती व्हावी असा आग्रह पवार साहेबांकडे धरला होता. तरी पण त्यांचा मान, सन्मान व त्यांच्याविषयीचा आदर असल्याने मी त्यांच्यासोबत राहिलो. त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाची संधी दिल्याबद्दल मी सदैव त्यांचा आभारी राहीन. संधी मिळाल्यावर देशासाठी व जनतेसाठी चांगले काम करून पवार साहेब आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा सन्मान वाढविण्याच्या दृष्टीने मी सतत प्रयत्न केले.

Praful Patel
and SHarad Pawar
काँग्रेसमध्ये धुसफूस! मल्लिकार्जुन खरगेंच्या फोटोला काळे फासले, अधीर रंजन चौधरींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज

हे देखील खरे आहे की, 1999 मध्ये कॉंग्रेसमध्ये सतत अपमान होत असल्यामुळे कॉंग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना पवार साहेबांना करावी लागली. तेव्हा आम्ही त्यांच्यासोबत राहिलो.

आणि हे ही तितकेच खरे आहे की, 2004 मध्ये कॉंग्रेसने आमच्या पक्षाचे जास्त आमदार निवडून आल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद नाकारले. साहेब, तुमच्याबद्दलचा आदर कायम आहे! असं ट्वीट प्रफुल्ल पटेल यांनी केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com