Prakash Ambedkar : छत्रपती संभाजीराजेंना मनुस्मृती प्रमाणे शिक्षा देण्यात आली; प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याने खळबळ

Prakash Ambedkar
Prakash Ambedkarsakal

नवी दिल्ली : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती संभाजी राजे यांच्या हत्येबद्दल मोठं विधान केलं आहे. छत्रपती संभाजी राजे यांना मनुस्मृती प्रमाणे शिक्षा देण्यात आली होती, तसेच त्यांच्या हत्येत हिंदू देखील सहभागी होते असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

नवी दिल्ली येथे माध्यामांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, संभाजीराजे संगमेश्वरला का गेले यावर वाद आहे. त्यांची माहिती औरंगजेबापर्यंत कशी पोचली, जयचंद मुळे गेले असा इतिहास आहे. तसेच औरंगजेबने जो दंड दिला त्याची आम्ही निंदा करतो. गणोजी शिर्के, रामनाथ स्वामी यांनी संभाजीराजे संगमेश्वरला असल्याची माहिती पोचवली. संभाजीराजेंची हत्या, मुस्लिम धर्माशी सहमत नाही असेही प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.

Prakash Ambedkar
PM Narendra Modi : मोदी मेरा लाल! १४ लेकरांची आई PM मोदींना देणार १५ एकर जमीन; कारणही सांगितलं

छत्रपती संभाजी राजे यांना मनुस्मृती प्रमाणे शिक्षा देण्यात आली, आपण औरंगजेबचा जितका निषेध करतो तितका शिर्के, आबा भटजी यांचाही निषेध करायला हवा. हे वस्तुस्थितीला धरून नाही. हिंदू-मुस्लिम, जैन-हिंदू हा वाद जो देशात होतोय त्याबाबत जो इतिहास दिला जातो तो बरोबर नाही. संभाजीराजे यांच्या हत्येत हिंदू सहभागी होते असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

Prakash Ambedkar
Mumbai Rains : मातोश्रीच्या बाहेरच्या डबक्यात कागदी होड्या सोडायच्या वयात हे…; भाजपकडून आदित्य ठाकरेंची खिल्ली

औरंगजेब कबरीवर जात त्यावर फुल वाहिली याबद्दल बोलताना आंबेडकर म्हणाले की, मी कबरीवर फुल चढवली, माझ्या निर्णयामुळे जी दंगल झाली असती ती थांबली. अनेकजण कबरीवर गेले आहेत, असेही प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com