
Chandrashekhar Bawankule: सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या संभाजी ब्रिगेड या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे हल्ला झाला. या हल्ल्याचे सूत्रधार हे भाजप नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हेच असल्याचा आरोप गायकवाड यांनी बुधवारी केला. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.