
मुंबई : संपूर्ण राज्याला मान्सूनपूर्व पावसाने यंदा चांगलेच झोडपून काढले आहे. अनेक भागांमध्ये ढगफुटीसदृश पाऊस पडला आहे. त्यामुळे भिंतींसह घरे पडली आहेत. जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर शेतीचेदेखील मोठे नुकसान झाले आहे. याच संदर्भात राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांना पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. शासकीय निकषानुसार पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई देणार असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.