esakal | बौद्ध शिल्प उद्यान प्रकल्पाचे सादरीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

नागपूर येथे उभारण्यात येत असलेल्या बुद्धीस्ट थीम पार्कचे संकल्पचित्र

नागपूर त्रिशताब्दी (१७०२-२००२) महोत्सव अंतर्गत विकासासाठी घेतलेल्या जागतिक दर्जाच्या बुद्धिस्ट थीम पार्क (बौद्ध शिल्प उद्यान) प्रकल्पाचे सादरीकरण राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत आणि पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत येथील सह्याद्री राज्य अतिथिगृह येथे आयोजित बैठकीत गुरुवारी करण्यात आले.

बौद्ध शिल्प उद्यान प्रकल्पाचे सादरीकरण

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - नागपूर त्रिशताब्दी (१७०२-२००२) महोत्सव अंतर्गत विकासासाठी घेतलेल्या जागतिक दर्जाच्या बुद्धिस्ट थीम पार्क (बौद्ध शिल्प उद्यान) प्रकल्पाचे सादरीकरण राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत आणि पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत येथील सह्याद्री राज्य अतिथिगृह येथे आयोजित बैठकीत गुरुवारी करण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नागपूर येथील फुटाळा तलाव तेलंगखेडी येथे बुद्धिस्ट थीम पार्क प्रकल्प हे शताब्दी महोत्सव समितीच्या कार्यक्रमाअंतर्गत करण्यासाठी २००१ मध्ये तत्कालीन उत्तर नागपूर मतदार संघाचे आमदार डॉ. नितीन राऊत यांनी पुढाकार घेतला होता. त्यामुळे या प्रकल्पासाठी तत्कालीन नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी दिलेल्या निर्देशानुसार मौजे फुटाळा येथे अंदाजे ११२.५८ हेक्टर जागेवर बौद्ध शिल्प उद्यानासाठी आरक्षित ठेवण्याचे ठरले होते. या जागेची मालकी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे असून प्रकल्पासाठी ती संपादित करण्यासाठी सरकारी स्तरावर प्रयत्न चालू आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उद्यानाचे नामकरण
बौद्ध शिल्प उद्यान यात बदल करून याचे नामकरण ‘बुद्धिस्ट थीम पार्क’ असे करण्यास नागपूर सुधार प्रन्यासाने यापूर्वीच निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे करण्याचे प्रस्तावित केले आहे. प्रस्तावित बौद्ध शिल्प उद्यानाचे सादरीकरण प्रसिद्ध वास्तुविशारद अशोक मोखा यांनी केले. जागतिक बँकेचे सल्लागार रवी बनकर, पर्यटन विभागाच्या मुख्य सचिव वल्सा नायर-सिंह, पशुसंवर्धन विभागाचे मुख्य सचिव अनुप कुमार आदी अधिकारी उपस्थित होते.

बौद्ध शिल्प उद्यान

  • प्रकल्पाला अंदाजे एक हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित.
  • या प्रकल्पाकडे जगातील सर्व बौद्ध राष्ट्रांचे आकर्षण ठरणार.
  • नागपूर हे पर्यटनाचे जागतिक केंद्र तयार होऊ शकेल.

Edited By - Prashant Patil