

New Governor of Maharashtra Vishnu Dev Varma
esakal
नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विविध राज्यांतील राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेशांतील नायब राज्यपाल पदांमध्ये मोठा फेरबदल केला असून तेलंगणाचे राज्यपाल विष्णुदेव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आतापर्यंत गुजरातचे राज्यपाल देवव्रत आचार्य यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची अतिरिक्त जबाबदारी होती.