'माझा नंबर आधी होता म्हणत राऊतांचं मत बाद करा', लोणीकरांची मागणी

देशात आज राष्ट्रपती पदासाठी मतदान पार पडत असून आतापर्यंत महाराष्ट्रातील 41 आमदारांनी मतदान केलं आहे.
Babanrao Lonikar jalna
Babanrao Lonikar jalna

मुंबई : देशात आज राष्ट्रपती पदासाठी मतदान (Presidential Election) पार पडत असून आतापर्यंत महाराष्ट्रातील 41 आमदारांनी मतदान केलं आहे. त्यापैकी शिंदे गटातले 34 आमदार असून सात अपक्ष आमदार आहेत. या सर्वामध्ये भाजप आमदार बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांनी काँग्रेसचे नेते नितीन राऊत (Nitin Raut) यांचे मत बाद करण्याची मागणी केली आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडे (Election commission) तक्रार करणार असल्याचेही लोणीकर यांनी म्हटले आहे. माझा नंबर पहिले असताना नितीन राऊत यांनी आपल्या आधी मतदान केल्याचे लोणीकरांचे म्हणणे आहे. (Babarao Lonikar News In Marathi)

Babanrao Lonikar jalna
Bus Accident : इंदूरहून अमळनेरकडे येणाऱ्या बसला भीषण अपघात; 13 जणांचा मृत्यू

मतदानासाठी आम्ही एक तास रांगेत उभे होता मात्र, राऊत अर्धा तास आतमध्ये जाऊन बसले. एवढेच नव्हे तर, माझे मतदान पहिले असताना राऊतांनी पहिले मतदान केले. तसेच मतदानावेळी मतदान कक्षात जाऊन बसता येत नाही, असे असताना ते अर्धा तास आतमध्ये जाऊन बसल्याचा आरोप लोणीकर यांनी केला आहे. त्यामुळे आपण याबाबत निवडणूक आयोगाकडे नितीन राऊत यांचे मतदान रद्द करण्याची मागणी करणार असल्याचे लोणीकरांनी म्हटले आहे. याबाबतचे व्हि़डीओ फुटेजदेखील असल्याचे लोणीकरांनी म्हटले आहे. त्यामुळे लोणीकरांच्या या मागणीवर निवडणूक आयोग नेमका काय निर्णय घेणार हे पाहणे आवश्यक आहे.

पक्षमर्यादा झिडकारुन द्रौपदी मुर्मूंना मतदान होणार - आशिष शेलार

एनडीएच्या उमेदवार द्रोपदी मुर्मु यांचा विजय निश्चित आहे. आज रेकॉर्ड ब्रेक समर्थन मिळेल. सर्वपक्षीय मतदान होईल. महाराष्ट्रातून एनडीएच्या उमेदवारास मोठ्या संख्येनं मतदान होईल. तो आणखी एक राजकीय इतिहास ठरेल. मला महाविकास आघाडीचं अस्तित्व दिसत नाही. राज्यसभा, विधानसभा निवडणूकीत काय झालं ते पाहिलं. पक्षमर्यादा झिडकारुन आज द्रोपदी मुर्मु यांच्या समर्थनात मतदान होईल, अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार आशिष शेलार यांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com