मुंबई - कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना चौफेर टीकेला सामोरे जावे लागत आहे. या प्रकरणांवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, त्याचप्रमाणे सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार तसेच शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत आणि काँग्रेसचे नेते नाना पटोले आदींनी कोकाटे यांचा समाचार घेत राजीनाम्याची मागणी केली.