Primary Teacher : राज्य सरकारचं अजब शिक्षक धोरण! तरुण ठेवले बाजूला निवृत्तांना सेवेत घेणार

school
schoolsakal
Updated on

मुंबईः राज्यामध्ये मागील अनेक वर्षांपासून शिक्षक भरती झालेली नाही. त्यामुळे लाखो तरुण बेरोजगार आहेत. दुसरीकडे राज्य शासनाने मात्र ज्येष्ठ शिक्षक भरती धोरण हाती घेतल्याचं दिसून येतंय. त्यामुळे नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या संभाव्य शिक्षकांवर अन्याय होतोय.

'३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक' हे राज्य शासनाचं शैक्षणिक धोरण आहे. मात्र मागच्या अनेक वर्षांपासून राज्यात शिक्षक भरती झालेली नाही. कोर्टामध्ये भरती प्रक्रियेसंदर्भातील अनेक याचिका प्रलंबित असल्याने सरकारला शिक्षक भरती घेता येत नाहीये. त्यामुळे शासनाने निवृत्त शिक्षकांना पुन्हा कंत्राटी पद्धतीने सेवेत घेण्याचं धोरण हाती घेतलंय. 'एबीपी माझा'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

school
Sharad Pawar : ''तुम्हाला काय करायचं ते करा...'' सैतान प्रकरणावरुन सदाभाऊ खोत आक्रमक

६० वर्षांवरील कंत्राटी शिक्षकांना २० हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. त्यासंबंधीचे अर्ज प्रशासनाकडे येण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे राज्यातील तरुण, बेरोजगार, भावी शिक्षक संताप व्यक्त करीत आहेत. शासनाने ही भरती गुपचूप पद्धतीने चालवल्याचा आरोप होत आहे.

school
Kirit Somaiya: "मी माझं कर्तव्य पार पाडलं, पण..."; NCPच्या सरकारमधील समावेशावर सोमय्या पहिल्यांदाच बोलले

६० वर्षांचा व्यक्ती आणि २५ वर्षांचा तरुण यांच्या क्रयशक्तीमध्ये फरक आहे, शिवाय तरुणांना नोकरीची गरज आहे आणि सदरील मानधनावर हे तरुण शिक्षक काम करायला तयार आहेत; त्यामुळे हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी काही आंदोलकांनी चॅनेलवर व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

The Melghat contractual teacher recruitment process has come under scrutiny over allegations of hiding vacant posts and violating RTE norms.
Relief for Students: Teacher Recruitment Through Pavitra Portal Despite Management Disputes
Karnataka government primary teacher recruitment 2026
Teacher Recruitment 2025: Candidates Demand Extension for Uploading Vacancies on Pavitra Portal
Marathi News Esakal
www.esakal.com