महाराष्ट्राने मोदींसोबत जाणे हिताचे : सावंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chief Minister Pramod Sawant

महाराष्ट्राने मोदींसोबत जाणे हिताचे : सावंत

शिर्डी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नवा भारत घडवायचा आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने मोदींसोबत जाणे हिताचे राहील, असे मत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले. शिर्डी येथे पत्रकारांशी ते बोलत होते. वाढदिवसानिमित्त साईबाबांच्या चरणी त्यांनी नवसपूर्ती केली.

आज सकाळी साडेदहाच्या सुमारास चार्टर प्लेनने त्यांचे विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर मोटारीने ते येथे आले. साईमंदिरात सहकुटुंब पाद्यपूजा करून शिर्डी माझे पंढरपूर ही छोटी आरती आळवली. साईबाबांच्या समाधीवर शाल चढविली. साईसंस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे यांनी त्यांचे स्वागत केले.

सावंत म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी कुणासोबत राजकारण करीत नाहीत. ‘सबका साथ, सबका विकास’ ही त्यांची कार्यपद्धती आहे. गोवा निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वी आपण साईदर्शनासाठी येथे आलो. गोवेकरांच्या सेवेची संधी द्या, अशी साईबाबांकडे प्रार्थना केली होती. बाबांनी माझी इच्छा पूर्ण केली. ’’

Web Title: Prime Minister Narendra Modi Wants Create New India Interest People Maharashtra With Modi Goa Chief Minister Pramod Sawant

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top