पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

सोलापूर लोकसभेचे भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारानिमित्त सोमवारी (ता. 29) नरेंद्र मोदी यांची सोलापुरातील होम मैदानावर सकाळी 11 वाजता जाहीर सभा होणार आहे. होटगी रोड विमानतळावरील हेलिपॅडवर उतरून पंतप्रधान मोदी होम मैदानावर येणार आहेत.
narendra modi
narendra modisakal

सोलापूर : सोलापूर लोकसभेचे भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारानिमित्त सोमवारी (ता. २९) नरेंद्र मोदी यांची सोलापुरातील होम मैदानावर सकाळी साडेबारा वाजता जाहीर सभा होणार आहे. होटगी रोड विमानतळावरील हेलिपॅडवर उतरून पंतप्रधान मोदी होम मैदानावर येणार आहेत. सभेसाठी येणाऱ्या वाहनांची ठिकठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आली असून शहरातील काही मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवले जाणार आहेत.

होटगी रोड विमानतळावरील रन-वेसह इतर कामे सुरू आहेत. त्यामुळे त्याठिकाणाहून अद्याप विमानसेवा सुरू झालेली नाही. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हेलिकॉप्टरने सोलापूरला येणार आहेत. त्यांचे हेलिकॉप्टर विमानतळावरील तीन हेलिपॅड आहेत, त्याठिकाणी उतरणार आहे. तेथून ते सभेच्या ठिकाणी होम मैदानावर मोटारीने येतील.

दरम्यान, उद्या (सोमवारी) विमानतळ, आसरा चौक, महिला हॉस्पिटल, महावीर चौक, आरडीसी कॉर्नर, सात रस्ता, व्होडाफोन गॅलरी, रंगभवन ते होम मैदान हा मार्ग दुपारी दीड ते चार वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. त्याशिवाय रंगभवन ते डफरीन चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते मार्केट यार्ड पोलिस चौकी हा मार्ग देखील सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी स्पष्ट केले आहे. या मार्गांवरील वाहनांनी इतर पर्यायी रस्त्याचा अवलंब करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

सोलापूरकरांच्या ‘या’ प्रश्नांवर पंतप्रधान मोदी बोलतील का?

  • १) देशाच्या सीमेवरील सैन्याच्या गणवेश शिलाईची उद्योजकांना प्रतीक्षाच

  • २) स्मार्ट सिटी होऊनही आयटी कंपनी नाही, तरुणांचे स्थलांतर सुरूच

  • ३) विडी उद्योग, गारमेंट, वस्त्रोद्योगातील महिला कामगारांचे प्रश्न कायम

  • ४) सोलापूरकरांना अजूनही मिळत नाही पुरेशा दाबाने व नियमित पाणी

  • ५) ‘उडान’ योजनेला १० वर्षे पूर्ण, तरीदेखील विमानसेवा ठप्पच

सभेसाठी येणाऱ्यांसाठी स्वतंत्र पार्किंग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला येणाऱ्यांसाठी वाहनतळांची (पार्किंग) व्यवस्था करण्यात आली आहे. होम मैदानाजवळील मार्केट पोलिस चौकी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथूनच प्रवेश दिला जाणार आहे. मंगळवेढा व पंढरपूरकडून तसेच जुना पुणे नाका, तुळजापूर रोडकडून येणाऱ्या नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणाहून वाहने जुनी मिल कंपाउंड व मरिआई चौक येथील एक्झिबिशन ग्राउंडवर लावावीत. तसेच अक्कलकोटकडून येणाऱ्यांना सिव्हिल चौकातून नूमवि प्रशालेमागून किंवा पुंजाल मैदान येथून यावे लागणार आहे. त्यांची वाहने मुलांचे शासकीय वसतिगृह मैदान येथे वाहने लावावीत. होटगी रोडवरून येणाऱ्यांनी विजापूर रोड, पत्रकार भवन, मोदी पोलिस चौकीमार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून सभेला यावे. त्यांची वाहने संगमेश्वर महाविद्यालयाजवळील स्काऊट गाइड मैदान किंवा नूमवि प्रशालेजवळील मुलांच्या शासकीय वसतिगृहाच्या मैदानावर लावावीत. तसेच नॉर्थकोट मैदान व हुतात्मा स्मृती मंदिर येथे दुचाकी वाहने लावता येतील, असे प्रशासनाने कळविले आहे.

पंतप्रधानांच्या सभेपूर्वी अनेकजण पोलिसांच्या ताब्यात

उद्या (सोमवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोलापुरातील होम मैदानावर सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी रविवारी (ता. २८) आम आदमी पार्टीसह इतर काहींना सदर बझार पोलिसांनी ताब्यात घेतले होते. संबंधितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याचे पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

मंगळवारी पंतप्रधानांची पुन्हा माळशिरसमध्ये सभा

सोलापूर शहरातील सभा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सातारा, पुण्यातील सभेसाठी जाणार आहेत. त्यानंतर मंगळवारी (ता. ३०) सकाळी ११ वाजता पुन्हा ते माळशिरसमध्ये भाजप महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारानिमित्त सभा घेणार आहेत. सभा पार पडल्यानंतर पंतप्रधान मोदी धाराशिव, लातूर येथे सभेसाठी जाणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com